गुन्हे वृत्त मुंबई

बीपीसीएल कंपनीच्या ऑईलमध्ये भेसळ करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ! 5.18 लाखांची ऑईल भेसळ

मुंबई गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष 9 ची उत्तम कामगिरी
 मुंबई :    बीपीसीएल कंपनीच्या फर्नेस ऑईलची चोरी करून उर्वरित ऑईलमध्ये पाणी टाकून भेसळ करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. ही उत्तम कामगिरी मुंबई गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष 9 च्या पथकातील पोलीस निरीक्षक आशा कोरके यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने केली. आरोपींनी एकूण 14 हजार 800 लिटरहून अधिक (5 लाख 18 हजार रुपये) ऑईलमध्ये भेसळ केल्याचे तपासादरम्यान उघडकी आणले आहे.
     चेंबूर परिसरातील माहुल गाव येथे बीपीसीएल कंपनी आहे. या कंपनीच्या समोरील पार्किंगमध्ये बीपीसीएल कंपनीच्या ऑईल टँकरमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी टाकून भेसळ होत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक आशा कोरके यांना मिळाली. त्या माहितीनुसार पोलिसांनी पार्किंगमध्ये धाड टाकली. त्यावेळी ऑईलच्या 3 टँकरमधील कप्प्यांमध्ये पाणी व भेसळयुक्त फर्नेस ऑईल आढळून आले.
     या प्रकरणी आरसीएफ पोलीस ठाण्यात भादंवि कलम 379, 420, 472, 462, 484, 120(ब) सह जिवनावश्यक वस्तू व कायदा कलम 3, 7 नुसार गुन्हा दाखल करून सफू नसिम खान (48), राजू कैलास सरोज (32), याकूब मोहम्मद नसिम सिद्धिकी (26) यांना बेड्या ठोकण्यात आल्या. या कारवाईत 3 टँकरसह भेसळयुक्त ऑईल जप्त करण्यात आले असून, या गुन्ह्याचा पुढील तपास गुन्हे शाखा कक्ष 9 चे पथक करत आहे.
      भेसळ करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश सह पोलीस आयुक्त (गुन्हे) संतोष रस्तोगी, गुन्हे प्रकटीकरण – 1 चे उपायुक्त अकबर पठाण, सहाय्यक पोलीस आयुक्त (डी/पश्चिम) भारत भोईटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आशा कोरके, संजीव गावडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर जाधव, शरद धराडे, पोलीस उपनिरीक्षक वाल्मिक कोरे, विजेंद्रय आंबावडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बनसोडे, हवालदार शिर्के, शिंदे, मोहिते, जाधव, काकडे, गावकर, सावंत, पाटील, शिंदे, शेख, कोळी, झोडगे, पोलीस नाईक पेडणेकर, नाईक, हाक्के, राऊत, लोखंडे, पाटील, कदम, वानखेडे, परब, पोलीस शिपाई कांबळे, महांगडे, पवार, गवते, निकम, महिला पोलीस शिपाई लाड आदी पथकाने केला.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!