डोंबिवली : लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकारांची मोठी कुचंबणा करण्याचे काम निवडणूक निर्णय अधिकारी करत आहेत. ते निवडणुकीच्या कामासाठी डोंबिवलीतील पालिकेच्या विभागीय कार्यालयातील पत्रकार कक्षाचा ताबा घेण्याच्या तयारीत आहेत. पत्रकार कक्षात पत्रकारांचे कॅमरे आणि लॅपटॉप ठेवण्यासाठी प्रत्येकी सुविधा महापालिकेच्या माध्यमातून करणात आली आहे. तसेच स्वतंत्र नेटवर्क सुविधा आहे. निवडणुकीच्या लगीन घाईत अधिकारी वर्ग वाहतुकोंडीतून सुटका करून घेण्यासाठी रेल्वे स्थानकाशेजारील पालिकेच्या जागा ताब्यात घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे पत्रकार संतप्त झाले असून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मनमानी करत सदर पत्रकार कक्ष ताब्यात घेतल्यास पत्रकार आंदोलन करतील असा इशारा दिला आहे.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी डोंबिवली विभागीय कार्यालयातील काही कार्यालये ताब्यात घेतले असून आता पत्रकार कक्ष ताब्यात घेण्याच्या तयारीत आहेत. यावर पत्रकारांनी आक्षेप घेत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गजेद्र पाटोळे यांची भेट घेतली. यावर पाटोळे याबाबत मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी पवार यांच्याशी चर्चा करून मार्ग काढू असे संगीतले.पत्रकारांचे कॅमरे आणि लॅपटॉप ठेवण्यासाठी प्रत्येकी सुविधा महापालिकेच्या माध्यमातून करणात आली आहे. तसेच स्वतंत्र नेटवर्क सुविधा आहे. अशा या पत्रकारांच्या सोयीयुक्त जागेवर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवून आयाती सुविधा मिळत असल्याने त्यांनी पत्रकार कक्ष ताब्यात घेण्याचे ठरविले आहे. निवडणूक आयोगाने महापालिकेकडून सावित्रीबाई फुले नाट्यगृह, तरणतलाव, बंदिस्त सभागृह आणि या शिवाय डोंबिवली विभागीय कार्यालयातील आंबेडकर सभागृह आणि इतर कार्यालये घेतली असून त्यांना याव्यतिरिक्त अजून अधिक जागा पाहिजे हे पालिका आयुक्तानाही अवगत नाही. मुळात डोंबिवली इंदिरा चौकात आधिच वाहतूक कोंडीने शहरात कोंडी झाली असून जर निवडणूक आयोगाने डोंबिवली विभागीय कार्यालय काबीज केले तर डोंबिवलीत वाहतूक कोंडीचा वाढीव त्रास होणार आहे. निवडणूक काळात निवडणूक आयोगाने जर पत्रकारांच्या हक्काच्या जागेवर ताबा घेतल्यास पत्रकार आंदोलन करतील असा इशारा दिला आहे.