मुंबई

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील रिक्त पदे भरण्याची कार्यवाही सुरु

मुंबई, दि. 20 : राज्य शासनाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांच्या नियुक्तीची मार्गदर्शक तत्वे निश्चित करण्याबाबतचा शासन निर्णय दि. 11 सप्टेंबर 2019 रोजी निर्गमित केला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडील सदस्यांची 4 पदे रिक्त असून ही रिक्त पदे भरण्यासाठी राज्य शासनाने जाहिरात प्रसिद्ध केली असून ती राज्य शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर नवीनतम संदेश या टॅबखाली उपलब्ध आहे.

मार्गदर्शक तत्वांमध्ये सदस्य पदासाठीची अर्हता विहित करण्यात आलेली आहे. राज्यामध्ये सदस्य पदासाठी निश्चित केलेल्या अर्हतेनुसार उमेदवार निवडले जाणार आहेत. यासाठी अर्हताधारक इच्छुक व्यक्तींकडून दि. 5 ऑक्टोबर 2019 पर्यंत अर्ज सामान्य प्रशासन विभागाने मागविले आहेत.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!