ठाणे

बाल शक्ती व बालकल्याण पुरस्कारासाठी अर्ज करण्यासाठी 30 सप्टेंबर पर्यंत मुदत वाढ

ठाणे दि.21 (जिमाका):केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत बाल शक्ती पुरस्कार व बालकल्याण पुरस्कार दिला जातो.ज्या मुलांनी (वय 5 पेक्षा अधिक व 18 वर्षापर्यंतच्या) शिक्षण, कला,सांस्कृतिक कार्य,खेळ नाविन्यपुर्ण शोध,सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपुण्यपुर्ण कामगिरी केलेली आहे,त्यांना बाल शक्ती  पुरस्कार  दिला जातो.

  बालकल्याण पुरस्कार –  मुलांच्या विकास संरक्षण व कल्याण या क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे वेतन अथवा मानधन न घेता मानसेवी उदात्त भावनेतुन किमान 7 वर्षे काम करणाऱ्या व्यक्तिस  वैयक्तीक  पुरस्कार दिला जातो.तसेच बालकल्याण क्षेत्रात अपवादात्मक कार्य करणाऱ्या संस्थेला  संस्थास्तरावरील पुरस्कार दिला जातो. संस्था पुर्णत: शासनाच्या निधीवर अवलंबुन नसावी.तसेच बालकल्याण क्षेत्रात किमान 10 वर्षे सातत्यपुर्ण उत्कृष्ट कार्य करणारी असावी.

   बाल शक्ती पुरस्कार सन 2019 व बालकल्याण पुरस्कार 2019 करिता केंद्र शासनाने अर्ज  मागविलेले आहेत.सदरचे अर्ज हे www.nca-wcd.nic.in  या संकेतस्थळा मार्फत ऑनलाईन पध्दतीने स्वीकारले  जाणार आहेत.पुरस्काराची माहिती संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे.अर्ज करण्याची अंतिम मुदत  वाढवून  दि.30.09.2019 पर्यंत करण्यात आली आहे. पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन आयुक्त महिला व बाल विकास,महाराष्ट्र राज्य,पुणे यांनी केले आहे.

About the author

Aapale Shahar

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

ठाणे

ठाणे

देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व हरघर तिरंगा अभियान सुरू असतानाच शहापूर तालुक्यातील आद्यक्रांतीकारी राघोजी भांगरे यांच्या समाधी स्थळांची दयनीय अवस्था ?जिल्हाधिकां-याचा सकारात्मक प्रतिसाद !

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!