ठाणे

काँग्रेस महिला अध्यक्ष : शिवसेना पदाधिकार्‍यांचा भाजपात प्रवेश

अंबरनाथ मतदार संघात पक्षातंराने निवडणूकीचे बिगुल वाजू लागले
अंबरनाथ दि. २३ :   राज्यात विधानसभा निवडणूका जाहीर होण्यापूर्वी अनेक पक्षातून भाजपात प्रवेशाची भरती आली असतांना विधानसभा निवडणूकीचे बिगूल वाजवत रविवारी अंबरनाथमधील काँग्रेस व शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी मुंबई येथे झालेल्या एका कार्यक्रमात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रदेश सचिव आमदार नरेंद्र पवार, प्रदेश मंत्री मुंकूंद कुळकर्णी, ठाणे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष दयानंद चोरघे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश करण्यात आला. शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष तथा भाजपनेते गुलाबराव करंजुले-पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठया संख्येने पक्षातंर घडून आणल्याने भाजपात उत्साही वातावरण झाले आहे.
२०१४ च्या विधानसभा निवडणूकीत शिवसेनेचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी भाजपचे राजेश वानखेडे यांचा अल्पमतांनी पराभव केला होता. दरम्यान पालिका निवडणूकीत भाजप नगरसेवक संख्याबळ वाढल्याने अंबरनाथ मतदार संघ भाजपला सोडावा अशी मागणी जोरावर असतांना शिवसेना व काँग्रेस पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी ऐन निवडणूकीच्या तोंडावर भाजपात प्रवेश केल्याने शहरात पक्षांतर चर्चेने खळबळ उडाली आहे.
                      भाजपात प्रवेश केलेले पदाधिकारी
निलिमा नायडू (काँग्रेस महिला शहर अध्यक्ष), माजी नगरसेवक मुक्कू लेनिन (त्यांची पत्नी काँग्रेस पक्षाची विद्यमान नगरसेविका आहे), अंब्रेश गौडा (शिवसेना उपविभागप्रमुख), देवेंद्र यादव (उत्तर भारतीय आघाडी शहर संघटक), साईनाथ रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष राजा महाडीक (यांचा मुलगा रोहित महाडिक हे शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक आहेत), भाट समाजाचे अध्यक्ष भुषण गारुंग, अविनाश गायकवाड यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. 
               यावेळी भाजपनेते गुलाबराव करंजुले-पाटील, विधानसभा अध्यक्ष डॉ. मनोज कंदोई, महिला शहराध्यक्षा सुजाता भोईर, महिला मोर्चाच्या मंजू धल, शहरप्रभारी नगरसेवक सुनिल सोनी, अल्पसंख्यांक प्रदेश उपाध्यक्ष याकुब सय्यद, ओबीसी सेल प्रदेश सचिव अजित खरात, जिल्हा सचिव खानजी धल, युवानेते अभिजित करंजुले, विश्वजीत करंजुले, राजेश कौठाळे, दिलीप कणसे, युवा मोर्चाचे मनेष गुंजाळ, शहर उपाध्यक्ष संतोष भोईर, डॉ. सचिन राठोड, संतोष वंदाळ, लक्ष्मण पंत, रुपाली लठ्ठे, क्रिष्णाबा सिसोदिया, आशा देशमुख, प्रभाकर भोईर, विश्वासराव निंबाळकर, शंकर रहाणे, महेश बनसोडे, रणविजय यादव, श्रीकांत रेड्डी, ईश्वर गुंजाळ व इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!