ठाणे

डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार महिन्यात ८२ प्रवाश्यांचा मृत्यू

डोंबिवली  :  डोंबिवली रेल्वे स्थानकावर प्रवाशाची वाढती गर्दी अपघाती मृत्यूला कारण ठरत असून त्यातच पावसाळ्याच्या चार महिन्यात ८२  प्रवाशाचा मृत्यू झाला आहे
रेल्वेच्या सूत्रांच्या माहितीनुसार जून -२२ ,जुलै-१९ ,ऑगस्ट -२४  व सप्टेंबर २३  तारखेपर्यंत १७  असे ८२  प्रवासी अपघातात प्राणास मुकले आहेत.
    डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हददीत वसई, जुचंद्र, कोपर, अप्पर कोपर, भिवंडी, बापगाव, कामण, डोंबिवली ठाकुर्ली व अप्पर कोपर अशी रेल्वे स्थानके असून पोलीसांना सुविधा मिळत नसल्याने जखमी प्रवाशाला आणण्यासाठी स्ट्रेचर, रुग्णवाहिका, हमाल आदिंची सोय नाही. सोमवारी रात्री अप्पर कोपर रेल्वे स्थानकावर झालेल्या अपघातात तरुण जखमी झाल्यानंतर त्याला तेथेून आणण्यासाठी हमाल मिळत नाही. इतर सुविधा नाही तसेच दिवा वसई मार्गावर मर्यादित ट्रेन धावत असल्याने रेल्वे पोलीसाना जखमी प्रवाशाला आणण्यासाठी पायपीट करावी लागते. या मार्गावर वेळेवर उपचार मिळाले तर प्रवाशांचे प्राण वाचू शकतील. मात्र त्याच मिळत नसल्याने अपघातात बळींची सख्या वाढत आहे. या संदर्भात डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षण सतीश पवार यंाना विचारले असता त्यानी लोहमार्ग पोलीस आपले काम करण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगीतले व ज्या त्रुटी  आहेत त्या वरिष्ठांपर्यत कळवल्या असल्याचे सांगीतले.जखमी प्रवाशाला तातडीने उपचार मिळाले तर त्याचे प्राण वाचू शकतील असेही कर्मचारी सांगत आहेत. लोकल सेवेवरील ताण वाढवण्यासाठी सर्व लोकल १५  डब्याच्या करून ५  व  ६ वा रेल्वे लाईन  सुरू करून लोकल फेऱ्या वाढवणे हा एक नजीकचा पर्याय असल्याचे रेल्वे कर्मचारी सांगतात.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!