डोंबिवली : युग फॉउंडेशनच्या वतीने ठाकूर सभागृहात संकल्प ब्रम्हविधा निरुपण समारोपिय सोहळा पार पडला.सोहळ्यात प्रास्ताविक युग फॉऊंडेशनच्या अध्यक्षा कल्पनाताई किरतकर यांनी केले. तसेच सदर सोहळ्यात प्रमुख प्रवचन श्रद्धेय प.पु. राहुलदादा तळेगांवकर उर्फ़ सागरदादा यांनी केले. तसेच सदर सोहळ्यात खास उपस्थिती प्रमुख अतीथी म्हणुन उच्चन्यायालयाचे न्यायाधीश सौ किर्ती कुलकर्णी होत्या त्यांनी आपल्या भाषणात हजार वर्षा पुर्वीच महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांनी महिला ना ज्ञान आत्मसात करण्याचे स्वातंत्र्य दिले गेले होते.असे प्रतीपादन केले. या सोहळ्यात पुणतांब्या चे प.पु. श्रद्धेय विलासराज पंजाबी , सुनिताताई पंजाबी , तसेच फलटनचेभाईदेव बिडकर, नाशीक गंगापुरचे बालकृष्ण बाबा तसेच निरंजनमुनी बाबा आदी उपस्थित होते. उल्हासनगर वास्तव्य असनारे श्री कृष्ण मंदिराचे संचालक प.पु. श्रद्धेय राहुल दादा यांनी आपल्या प्रवचानात श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. ते म्हणाले कि असे आध्यात्मिक कार्यक्रम समाजात होणे गरजेचे आहे या माध्यमातुन तरुण पिढीला सुसंस्कारित करता येईल आणि ही काळाची गरज आहे.असे प्रतीपादन केले. पुढे म्हणाले कि या कार्यक्रमाचे आयोजन कल्पनाताई यांनी करुन समाजाला दिशा देन्याचे कार्य करीत आहे. दर वर्षी असाच कार्यक्रम करुन ज्ञानदानाच पवित्र कार्य करीत आहे. सदर प्रवचन गेले नऊ दिवस सव्यास सभागृहा मध्ये दुपारी दोन ते चार वाजे पर्यंत ठेवण्यात आला होता. त्याचा समारोपिय सोहळा ठाकुर सभागृहा मध्ये पार पडला. सुमारे पाचशे सदभक्त सदर सोहळ्यास सहभागी झाले होते. प्रामुख्याने महिला वर्गाची उपस्थिती लक्षणीय होती. सोहळ्याच्या अंतीम भागात आभार प्रकट दयानंद किरतकर यांनी केले.
युग फॉउंडेशनच्या वतीने ठाकूर संकल्प ब्रम्हविधा निरुपण समारोपिय सोहळा…
September 23, 2019
35 Views
2 Min Read

-
Share This!