ठाणे

पीएमसी बँकेवर रिझर्व्ह बँकेने निर्बध लादून बँकेचे सर्व व्यवहार बंद केल्याने अंबरनाथ शाखेवर ग्राहकांची तुडूंब गर्दी

 अंबरनाथ पो. स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांच्या मध्यस्थीनंतर ग्राहकांनी केले सहकार्य 
 
अंबरनाथ दि. २४ (नवाज अब्दुलसत्तार वणू)  पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेवर (पीएमसी) रिझर्व बँक ऑफ इंडियाने निर्बध लादले असून, बँकेचे सर्व व्यवहार बंद करण्यात आले आहेत, पीएमसी बँक डबघाईला आल्याने रिझर्व्ह बँकेने हि कारवाई केली आहे. बँकिंग रेग्युलेशन मधील नियम ३५ अ अंतर्गत बँकेचे सर्व व्यवहार बंद करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे. हे समजताच पीएमसी बँक अंबरनाथ शाखेत ग्राहकांनी तुडूंब गर्दी करून संतप्त झाले होते. गर्दीवर नियंत्रण येत नसल्याने अंबरनाथ शाखेच्या मॅनेजर रेणुका चिपळूणकर यांनी अखेर अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांना कळविल्यानंतर संजय धुमाळ हे आपल्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यासोबत तात्काळ घटनास्थळी येत ग्राहकांची मध्यस्थी करून समाजविले व सहकार्य करण्याचे आवाहन केले. धुमाळ यांच्या आवाहनाला लक्षात घेऊन ग्राहकांनी सहकार्य केले. यावेळी भटके विमुक्त सामाजिक संघटनेचे अध्यक्ष सुंदर डांगे यांनीहि ग्राहकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.
         पीएमसी बँकांच्या सर्व शाखांचे आज सकाळपासून व्यवहार ठप्प झाले आहे. तसेच बँकेचे ऑनलाईन व्यवहारही बंद आहेत, दरम्यान, हे निर्बध पुढील सहा महिन्यांसाठी असल्याचे सांगण्यात येत आहे, त्यानंतर आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल. रिझर्व्ह बँकेने यासंदर्भातील आदेश प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार पीएमसी बँकेला रिझर्व्ह बँकेच्या परवानगीशिवाय नवे कर्ज देता येणार नाही. तसेच ठेवी स्वीकारता येणार नाही. तसेच पुढच्या काळात बँकेला गुंतवणूक ही करता येणार नाही. त्याचबरोबरच बँकेच्या ग्राहकांना आपल्या खात्यातून केवळ एक हजार रुपये एवढीच रक्कम काढता येईल, असे स्पष्ट केले आहे. देशाच्या बिकट अर्थव्यवस्थेमुळे बँकांना व्यवहार हाताळणं अवघड बनलय. पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँक आर्थिक गर्तेत सापडलीय. रिझर्व्ह बँकेने निर्बध घातलेत. पुढचे ६ महिने ठेवीदारांना नाहक त्रास होणार आहे.
            यासंदर्भात पीएमसी बँक अंबरनाथ शाखेच्या मॅनेजर रेणुका चिपळूणकर यांनी विचारले असता, आम्ही ग्राहकांना खात्री देतो कि तुमचे पैसे सुरक्षित आहेत. कृपया आपण आम्हाला पाठींबा देऊन या महत्त्वपूर्ण क्षणी आमच्यावर विश्वास ठेवा. निर्बध केवळ तात्पुरते कालावधीसाठी आहेत. असेही रेणुका चिपळूणकर यांनी सांगितले.

 

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!