ठाणे

प्रेमभंगापायी संतप्त झालेल्या तरुणाकडून पानटपरीवाल्याचा निर्घुण खून…

   मित्राने पोलिसांसमोर कबुली दिली…   

डोंबिवली ( शंकर जाधव ) प्रेमाची माहिती मुलीच्या वडिलांना दिल्याने प्रेमात अडसर निर्माण करणाऱ्या तरुणाचा प्रेमवेड्या तरुणाने आपल्या दोन साथीदारांसह एका तरुण पानटपरीवाल्याचा निर्घुण खून केला. ही घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास  डोंबिवली पूर्वेकडील मोठा गाव येथील रेतीबंदर रोडवरील सुंदरा प्लाझा इमारतीत घडली.विष्णूनगर पोलिसांनी घटना घडली. या प्रकरणी तिघा आरोपींना विष्णूनगर पोलिसांनी अटक केली असून यातील एक आरोपी अल्पवयीन आहे. यात एका साथीदाराने पोलिसांकडे कबुली दिल्याने हा खून प्रेमभांगातून झाल्याचे समोर आले.

    राकेश रामहरी यादव ( २८ ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.या तरुणाचे डोंबिवली पश्चिमेकडील स्टेशनजवळ पानटपरीचे दुकान होते.तर गणेश भोईर,रवी खिल्लारे आणि अल्पवयीन त्यांचा साथीदार या तिघांना अटक केली आहे.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राकेश यादव याच्या मित्राच्या मुलीबरोबर सफाईचे काम करणाऱ्या गणेश भोईर यांचे प्रेम संबध होते. याची माहिती राकेशने मित्राला दिली. राकेशचा मित्राने आपल्या कुटुंबासह उत्तरप्रदेशातील मूळ गावी निघून गेले.आपले प्रेम आपल्या पासून लांब गेले. आता तिची भेट होणार नाही या विरहामुळे संतप्त झालेल्या गणेशने राकेशचा काटा काढण्याचे ठरविले. गणेशोत्सवात राकेशला गणेशने जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. परंतु ही बाब राकेशने गंभीरपणे घेतली नाही.मंगळवारी रात्री गणेश आपल्या दोन मित्राबरोबर इमारतीच्या आवारात दबा धरून राकेश घरी येण्याची वाट बसले होते.बुधवारी पहाटेच्या सुमारास राकेश इमारतीच्या पहिल्या मजल्यावर येताच दबा धरून बसलेल्या तिघांनी राकेशला पाठीमागून पकडले.गणेशने त्यांच्या जवळील धारदार शास्त्राने पायावर आणि गळयावर वार केले.या हल्यात राकेश प्रतिकार करू नये म्हणून त्याच्या दोन मित्राने त्याला पडकले होते.इमारतीच्या रहिवाश्यांना आवाज येताच त्यांनी बाहेर पहिले असता राकेश इमारतीच्या मजल्यावर रक्ताचा थारोळ्यात पडल्याचे आढळून आले.आपण पकडले जाऊ या भीतीने तिघांनी इमारतीतून पळ काढला. रहिवाश्यांनी राकेशचा भाऊ जसवंत यादव याला कळवले असता त्यांनी विष्णूनगर पोलिसांना याची माहिती दिली. विष्णूनगर पोलिसांनी घटनास्थळी माहिती घेतल्यानंतर आरोपींचा तपास सुरु केला. तिघे आरोपी मोठा गाव येथील दिवा-वसइ रेल्वे लाईन येथील झुडपात लपून बसले होते. पोलिसांनी त्यांना पकडले असले तरी खून करताना तिघांनी वापरलेले धारदार हत्यार अद्याप हस्तगत झाले नाही.जसवंत यादव यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात तिघांविरोधात हत्या केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!