मुंबई

मुंबई दहशतवादविरोधी पथकात एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांची नियुक्ती

बदलीमुळे अनेक तर्कवितर्कांना उधाण

मुंबई :   एकेकाळी आपल्या अनोख्या स्टाईलने मुंबईत उदयाला येऊ पाहत असलेल्या टोळ्यांचा नायनाट करणाऱ्या एन्काऊंटर स्पेशालिस्ट पोलीस निरीक्षक दया नायक यांची दहशतवादविरोधी विभागाच्या मुंबई पथकात नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीपूर्वी दया नायक हे खार पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक पदी कर्तव्य बजावत होते. दया नायक यांच्या नियुक्तीमुळे मात्र अनेक चर्चांना, तर्कविर्तकांना उधाण आले आहे.
80-90 दशकात मुंबईवर अधिराज्य गाजवण्यासाठी अनेक टोळ्यांचा जन्म झाला होता. त्यामुळे स्वत:चे अस्तित्व टिकवण्यासाठी मुंबईत टोळी युद्धांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढले. या टोळ्यांचा तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांनी नायनाट केला. अनेकांचे एन्काऊंटर करून मुंबई गुन्हेगारीमुक्तीचा वसा हाती पोलिसांनी हाती घेतला. त्या पोलीस अधिकाऱ्यांपैकी एक आहेत दया नायक ! एकना अनेक कर्तबगारीनंतर एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांच्यावर आरोप, टीका झाल्या.
दया नायक यांनी कर्नाटक येथील मूळगावी मातोश्रींच्या नावे शाळेची इमारत उभारली आणि दया नायक यांच्यावर अपसंपदा जमावल्याबाबत टीकेची झोड उठली. गुंडांशी संंबंध असल्याचेही आरोप झाले. अन् दया नायक यांना खात्यातून निलंबित करण्यात आले. न्यायालयात मात्र दया नायक यांच्याविरुद्ध करण्यात आलेले आरोप सिद्ध न झाल्याने त्यांची निर्दोश मुक्तता करण्यात आली. दया नायक यांची सन्मामाने मुंबई पोलीस दलात पुन्हा नियुक्ती करण्यात आली.
सध्याची परिस्थिती पाहता मुंबईत अमलीपदार्थांच्या तस्कऱ्यांनी हौदोस घातला होता. ही बाब लक्ष घेऊन नव्याने रुजू झालेल्या कर्तव्यनिष्ठ दया नायक यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावताना अमलीपदार्थविरोधी कारवायांचा सपाटा लावला. एमडी, अमलीपदार्थ बनवणारे कारखाने उद् ध्वस्त केले. अनेक अमलीपदार्थ तस्कऱ्यांना तुरुंगात धाडले. दरम्यानच्या काळात सेवाजेष्ठतेनुसार दया नायक यांना पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती देऊन त्यांची नियुक्ती मंबईतील खार पोलीस ठाण्यात करण्यात आली.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र पोलीस राजपत्राद्वारे एक आदेश जारी करण्यात आला. त्यात पोलीस निरीक्षक दया नायक यांची दहशतवादविरोधी विभागाच्या मुंबई पथकात नियुक्ती करण्यात आल्याचा आदेश होता. सद्याच्या कर्तव्य ठिकाणावरून दया नायक यांना तात्काळ पदमुक्त करून नव्या नियुक्तीच्या ठिकाणी हजर राहण्याचा आदेश राजपत्रामध्ये देण्यात आले आहेत.
जिथे जातील तेथे पोलीस निरीक्षक दया नायक जबरदस्त कर्तव्य बजावतात, हे जगजाहीर आहे. आता तर दहशतवादविरोधी पथकात दया नायक यांची नियुक्ती झाली आहे. त्यामुळे दहशतवाद माजवणाऱ्यांचे काही खरे नाही, असे म्हटल तरी वावगे ठरणार नाही.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!