ठाणे

विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा यंत्रणा सज्ज

मतदान प्रक्रिये पासून कोणीही वंचित राहणार नाही

ठाणे :  ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदार संघात निवडणुक प्रक्रिया सुरळीतपणे राबिवण्यासाठी विविध यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. या निवडणुकीत जास्तीजास्त मतदारांना सहभागी होता यावे व कुणीही मतदाना पासून वंचित राहू नये यासाठी नियोजन करण्यात आले आहे. असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश नार्वेकर आज यांनी येथे सांगितले. विधानसभा निवडणूक २०१९ च्या कार्यक्रमाच्या संदर्भात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी वैदही रानडे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी अपर्णा सोमाणी आरोलकर उपस्थित होते.

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी समिती सभागृहात पत्रकारांशी दिलखुलास संवाद साधला. निवडणुकीच्या तयारी संदर्भात विविध मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केले. निवडणुकीच्या दरम्यान जिल्ह्यात १९५० हेल्पलाईन, सी व्हीजिल मोबाईल ऍप, भरारी पथके, सीसीटीव्ही यंत्रणा अशा विविध तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देखरेख व नियंत्रण ठेवले जाईल. राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, पोलीस यंत्रणा तसेच जिल्हा प्रशासन यांच्यात समन्वयातून निर्भय आणि मुक्त वातावरणात निवडणुका होतील असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. तसेच राजकीय पक्षांनी प्लस्टिकचा वापर टाळून निवडणूक प्रचार साहित्य हे पर्यावरण पूरक असेल या दृष्टीने प्रयत्न करावा. असेही ते म्हणाले

असे असेल निवडणुकीचे वेळापत्रक

जिल्ह्यात जिल्ह्यात 21 ऑक्टोबर 2019 रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.निवडणुकीसाठी दि. 27 सप्टेंबर रोजी अधिसूचना प्रसिद्ध होईल. दि. 4 ऑक्टोबर ही उमेदवारी नामांकन दाखल करण्याची शेवटची तारीख आहे.दि. 5 ऑक्टोबरला अर्जांची छाननी , दि. 7 ऑक्टोबर ही अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. दि. 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होईल.

सी-व्हिजिल व हेल्पलाईन

निवडणुकीत सी व्हिजिल, सुविधा या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात येणार आहे. नागरिकांना आचारसंहितेचा कुठे भंग होत असल्याचे दिसून आल्यास सी व्हिजिल या मोबाईल अप्लिकेशनच्या माध्यमातून तक्रार करता येईल. राज्यस्तरावर आणि जिल्हास्तरावर संपर्क केंद्र.

तक्रार निवारणासाठी 1950 हा टोल फ्री क्रमांक देण्यात आला आहे. राज्यस्तरावर 24 तास ही सेवा सुरू राहणार आहे.सुविधा या ऍपवर ३३ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्या तक्रारींचे तात्काळ निराकरण करण्यात येत आहे.

भरारी पथक

जिल्ह्यात ७७ भरारी पथके नेमली असून यामध्ये ठाणे पोलीस आयुक्तलयाच्या हद्दीत ५० तर नवी मुंबई हद्दीत ८ आणि ठाणे ग्रामीणमध्ये १९ अशी एकूण ७७ भरारी पथके आहेत.

शस्त्रपरवाने

जिल्ह्यात एकूण ६ हजार १६० शस्त्रपरवाने आहेत. यामध्ये ठाणे पोलीस आयुक्तलयाच्या हद्दीत ४ हजार ३२७, नवी मुंबई पोलीस आयुक्तलयाच्या हद्दीत ९६२ आणि ठाणे ग्रामीण पोलीस ८७१ आहेत. यापैकी निवडणुकीच्या काळात १ हजार ७२९ जमा करण्यात आली आहेत. यामध्ये ठाणे पोलीस आयुक्तालय हद्दीत,१ हजार ३९५, नवी मुंबई २२ आणि ठाणे ग्रामीण ३१२ अशी एकूण १ हजार ७२९ जमा करण्यात आली आहेत.

नाका बंदी

जिल्ह्यात १०१ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. यामध्ये ठाणे पोलीस आयुक्तलयाच्या हद्दीत ६३, नवी मुंबई पोलीस आयुक्तलयाच्या हद्दीत १२ आणि ठाणे ग्रामीण हद्दीत २६ असून अशी एकूण १०१ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे.

होर्डिंग्स, बॅनर

आचर संहिता जाहीर झाल्या नंतर आज पर्यंत ५ हजार ४१४ होर्डिंग्स, बॅनर आणि अन्य साहित्य हटवण्यात आले असून उर्वरित साहित्य हटवण्याचे कामकाज सुरु आहे.

एक खिडकी योजना

विधानसभा मतदार संघनिहाय एक खिडकी योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. यामध्ये वाहन परवाना, प्रचार कार्यालय परवाना, सभा, रॅली, लाऊडस्पीकर आदी योजनांचा लाभ घेता येणार आहे.

संनियंत्रण समित्या

आदर्श आचारसंहितेच्या कालावधीत जिल्ह्यातील निवडणूक खर्चावर देखरेख व नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. याकरीता जिल्हास्तरावर नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. राजकीय पक्षांच्या व उमेदवारांच्या जाहिराती प्रमाणिकरण करण्यासाठी जिल्हास्तरावर माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समिती (Media Certification and Monitoring Committee) स्थापन करण्यात आली आहे.

स्वीप कार्यक्रमाची ( मतदार जनजागृती उपक्रम ) आराखडा तयार

निवडणुकीच्या अनुषंगाने मतदार जनजागृतीसाठी प्रत्येक मतदारसंघात विशेष जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये मतदान करण्यासाठी आवाहन, इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनची (ईव्हीएम) सुरक्षितता इत्यादीबद्दल मतदारांना माहिती देण्यात येत आहे. इव्हिएम व व्हीव्हीपॅट यंत्रांचा वापर पूर्ण राज्यात प्रथम होणार असल्यामुळे मतदारांमध्ये यासंबंधी जनजागृती करण्यात येत आहे. सर्व मतदान केंद्राच्या ठिकाणी मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून प्रत्यक्ष मशिनवर यासंबंधीची माहिती देण्यात येत आहे. 21 सप्टेंबर – 300 कनिष्ठ आणि ज्येष्ठ महाविद्यालयाच्या प्रचार्यांसोबत बैठक घेणे. 18 वर्षेवरील विद्यार्थ्यांना मतदान करण्यास प्रोत्साहन देणे, 25 सप्टेंबर – स्वीप नोडल अधिकाऱ्यांसोबत नॉन स्विप एसी उपक्रमा संबंधित चर्चा करणे 27 सप्टेंबर – 17 एसी मधील चुनाव पाठशाळा उपक्रम सुरु करणे, 30 ते 15 सप्टेंबर – तालुकानुसार महिला मेळावे आयोजित करणे . महिलांमध्ये मतदान जागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबवणे. 3 आणि 4 ऑक्टोबर – महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन पथनाट्य स्पर्धेचे आयोजन करणे. 6 ते 13 ऑक्टोबर – सर्व मॉलमध्ये फ्लॅश मॉबस, 12 ऑक्टोबर – सायकल फेरी, 15 ऑक्टोबर – मॅरेथॉन, 14 ऑक्टोबर – रांगोळी स्पर्धा सर्वांसाठी खुली, 7 ते 19 ऑक्टोबर – विद्यार्थी फेरी, 1 ते 20 ऑक्टोबर – घंटागाडी गाणे , 1 ऑक्टोबर – गावा नुसार महिला बचत गट मेळावे, आरोग्य सेविका, 1 ऑक्टोबर – पथनाट्य, 20 ऑक्टोबर – मेसेज ब्लास्ट ( सर्व मोबाईल कंपनी)

ओळखपत्र कॅम्पचे आयोजन

यंदाच्या पुराच्या काळात ज्या नागरिकांचे ओळखपत्र वाहून गेले असेल असा नागरिकांसाठी काही दिवसातच त्यांच्या मतदारसंघात विशेष ओळखपत्र कॅम्पचे आयोजन करण्यात येईल. त्यामुळे कोणताही मतदार मतदान प्रक्रियेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात येणार आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

महाराष्ट्र

पंचायत राज यंत्रणेमार्फत शाश्वत विकासाची उद्दीष्टे गाठण्याचे प्रयत्न; ग्रामविकासाच्या योजनांच्या अंमलबजावणीत शाश्वत उद्दीष्टांचा समावेश आवश्यक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Advertisements

Advertisements

कोकण

error: Content is protected !!