ठाणे

कुष्ठरुग्ण,क्षयरुग्ण व असंसर्गजन्य रोगाचे जनजागृती अभियान

ठाणे   : कुष्ठरोग,क्षयरोग व असंसर्गिक आजारा विषयी जनमानसात जागृती करण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने जिल्ह्यात रोग प्रतिबंध जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम 7 ऑक्टोबर 2019 पर्यंत राबविण्यात येणार आहे.

ठाणे जिल्ह्यात एकूण 2 हजार 534 सर्वेक्षण टीमद्वारे घरोघरी जाऊन कुष्ठरोग,क्षयरोग व असंसर्गजन्य रोग प्रतिबंधक जनजागृती करुन कुटुंबातील प्रत्येक सदस्याची तपासणी करण्यात येत आहे. शिवाय रोगांच्या लक्षणांची माहिती देण्यात येत आहे. मनपातील व ग्रामीण भागातील एकूण 36 लाख 47 हजार 753 इतकी लोकसंख्याचे या मोहिमे अंतर्गत तपासणी करण्यात येणार आहे. तसेच रोगांचे लक्षण आढळणाऱ्या  संशयित रुग्णांची मोफत एक्सरे, थुकी तपासणी, सिबिनॅट तपासणी जवळच्या सरकारी दवाखान्यात करुन रोगाचे निदान झाल्यास त्यांना त्वरीत मोफत औषधोपचार चालु करण्यात येणार आहे.

या शोध मोहिमेत आरोग्य कर्मचारी,आशा सेविका व स्वयंसेवी संस्थांचे स्वयंसेवक यांचे गट  करून घरोघरी जावून भेटी देत असून कुष्ठरोग,क्षयरोग व असंसर्गिय आजार संबंधित पुर्ण माहिती व योग्य मार्गदर्शन देतील. या मोहितेमध्ये जनतेने सक्रिय सहभाग घेऊन कुष्ठरुग्ण,क्षयरुग्ण व असंसर्गजन्य रोग जनजागृती अभियान यशस्वी करण्यास सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ गीता काकडे यांनी केले आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!