डोंबिवली :- ( शंकर जाधव ) जागतिक हृद्यदिनानिमित्त डोंबिवली सायकल क्लबच्या वतीने रविवार २९ तारखेला सकाळी ७ वाजता गणेश मंदिर येथून फिट इंडिया रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. पोस्टमन, पेपरवाला, दूधवाला अशा पूर्वापार सायकल चालवणाऱ्या सायकल हिरोंचा व मान्यवरांचा सन्मान आणि हार्ट अटॅकच्या प्रथमोचारांचे प्रात्यक्षिक दाखवण्यात येणार आहे. यावेळी मुंबईच्या सायकल मेयर असलेल्या स्मार्ट कम्युटच्या फिरोजा सुरेश, मातृभाषेतून शिक्षण याविषयी जागृतीसाठी संपूर्ण भारताभर सायकलीवरून फिरणारा डोंबिवलीकर गांधार कुलकर्णी, भारतीय रेल्वेच्या बास्केटबॉल संघाच्या छत्रपती पुरस्कार विजेत्या प्रशिक्षक मनीषा डांगे,डोंबिवलीचे सायकलविक्रमवीर विनीद पुनामिया, राष्ट्रीय ज्युडोपटू पूर्वा मेथ्यु यांचाही विशेष उपस्थित सत्कार होणार आहे.या सायकल यात्रेत डोंबिवलीकरांनी सहभागी व्हावे अशी विनंती डॉ. सुनील पुणतांबेकर यांनी केली आहे.
डोंबिवलीत फीट इंडिया सायकल रॅली
September 26, 2019
28 Views
1 Min Read

-
Share This!