डोंबिवली : ( शंकर जाधव ) डोंबिवली पूर्वेकडील स्टेशनजवळील ६० वर्ष जुनी प्रसिद्ध तोरणा इमारतीवर बुधवारी सकाळी हातोडा पडला.`फ`प्रभाग क्षेत्र अधिकारी दीपक शिंदे यांनी इमारतीला धोकादायक जाहीर करण्यापूर्वी इमारत मालकाला स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची नोटीस दिली होती.या इमारतीच्या तळमजल्यावर १२ गाळे होते. दुकानदार आणि इमारत मालक याच्यात इमारतीबाबत कल्याण जिल्हा न्यायालयात खटला सुरु होता. अखेर न्यायालयाने सदर इमारत तोडण्याचे आदेश दिले. तर इमारतीच्या जागेवर नवीन इमारत बांधण्यात येणार असून त्यात दुकानदारांना दुकानासाठी जागा देणार आहेत असे दुकानदारांनी सांगितले. तर मंगळवारी रात्री ८ वाजल्यानंतर दुकानदारांनी दुकानातील समान बाहेर काढण्यास सुरुवात केली होती.इमारतीच्या तळमजल्यावर १० दुकाने, पहिल्या मजल्यावर साईपूजा हॉटेल व बार, तिसऱ्या मजल्यावर हॉल असून बाकी मजले रिकामे आहेत. या इमारतीत कोणीही रहात नव्हते/
डोंबिवली स्टेशनजवळील ६० वर्ष जुनी अतिधोकादायक तोरणा इमारतीवर हातोडा
September 26, 2019
57 Views
1 Min Read

-
Share This!