ठाणे

ठाणे पोलिस आयुक्तलयाच्या क्षेत्रात मनाई आदेश लागू

ठाणे दि. 28 : विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला असून नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने ठाणे पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रामध्ये येणाऱ्या १३ निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाच्या चहुबाजूने शांतता व सुरक्षितता राखण्यासाठी 100 मीटर परिसरात कलम 144( 2) अन्वये ठाणे पोलीस आयुक्त श्री. विवेक फणसळकर यांनी मनाई आदेश लागू केले आहेत.

या कार्यक्षेत्रात 134  भिवंडी ग्रामीण,136भिवंडी पश्चिम, 137 भिवंडी पुर्व,138 कल्याण पश्चिम,140 अंबरनाथ,141 उल्हासनगर,142 कल्याण पुर्व,143 डोंबिवली,144 कल्याण ग्रामीण,146ओवळा माजीवडा,147 कोपरी पाचपाखाडी,148 ठाणे,149 मुंब्रा कळवा आदी विधानसभा क्षेत्र येतात.

त्यामुळे या परिसरात कोणत्याही पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते , प्रतिनिधी बैठक, पत्रकार परिषद आदी कार्यक्रम घेण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. तसेच नामनिर्देशन अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवार व त्याच्या सोबत ४ व्यक्तींना निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कक्षामध्ये प्रवेश देण्यात येईल. त्याचप्रमाणे उमेदवारी अर्ज दाखल करण्यास येणाऱ्या उमेदवारास नमूद ठिकाणच्या कार्यालयाच्या १०० मीटर चहूबाजूकडील परिसराच्या आत फक्त तीन वाहने आणण्याची परवानगी देण्यात येत असून तीन पेक्षा अधिक वाहने सदर कार्यालयाच्या १०० मीटर परिसरात आणण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. हा आदेश २७ सप्टेंबर पासून 7 ऑक्टोबर 2019 मध्यरात्री पर्यंत अंमलात राहणार आहे. या मनाई आदेशाचा भंग  केल्यास  कलम 188 अन्वये कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!