`आधी पाणी द्या , नंतर मत मागायला या` फलक लागले.,
डोंबिवली :- ( शंकर जाधव ) २७ गावे कल्याण डोंबिवलीत समाविष्ट होऊन पाच चार वर्ष पूर्ण झाली. परंतु या गावांत सोयी-सुविधा देण्यास पालिका प्रशासन अपयशी ठरले आहेत.पाणी बिले भरूनही योग्य पाणी पुरवठा होत नसल्याने आता उमेदवारांनी आमच्या दारात येऊ नका अशी चीड गावकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. भाग ११४ भोपर -संदप भागातील नागरिकांनी संताप व्यक्त करत थेट प्रभागात `अगोदर पाणी द्या ,नंतर मत मागायला या`असे फलक लावले आहेत. १५० कुटुंबियांना हानिर्णय घेतला आहे.
देसलेपाडा येथील भद्रनगर संकुलातील नागरिकांनी परिसरात फलक लावले आहेत त्यात नमूद केले आहे की भद्रनगर संकुलात १५० कुटुंबे राहतात. मार्च २०१९ पर्यंत पालिकेची पाणी बिले भरली आहेत असे असूनही पाणी मिळत पाणी मिळत नसल्याने टॅंकरमार्फत पाणी पुरवठा करावा लागतो व यासाठी ५० हजार रुपये खर्च होत आहे असेही नागरिक बोलत आहेत आम्ही मतदान करूनही पाणी मिळणार नसेल तर मतदान का करायचे असा सवाल नागरिक विचारत असून `आधी पाणी द्या नंतर मत मागा`अशी स्पष्ट भूमिका त्यांनी घेतली असून तसे कापडी फलक देसलेपाडा भागात लावण्यात आले आहेत.
स्थानिक नगरसेविका रविना माळी यांना विचारले असता त्यांनी लोकवस्ती मोठ्या प्रमाणावर वाढली असून नवीन पाईप लाईन बसवण्याच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. एकच पाईप लाईन असून दुसरी लाईन मंजूर झाली आहे.शिवाय पाणी साठवण्याची टाकी बांधण्यात आली आहे. नवीन पाईप लाईन टाकन्याचे काम मंजूर असून ते लवकर व्हावे यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगितले.
स्थानिक आमदार सुभाष भोईर म्हणाले, या भागासाठी नवीन पाईप लाईन मंजूर झाली असून त्याचे काम पूर्ण झाले की या भागाला पाणी पुरवठा नीट होईल हे काम तातडीने पूर्ण व्हावे म्हणून पाठपुरावा सुरू असून वितरण व्यवस्था अपुरी असल्याचेही ते म्हणाले नागरिकांचा पाण्याचा प्रश्न नक्की मार्गी लागेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.