डोंबिवली ( शंकर जाधव ) गेल्या आठवडा भारतापासून पावसाने उघडीप दिल्यानंतर नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी साथीच्या आजारांनीर डोके वर काढल्याने नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे .तब्बल ४५० रुग्ण डेंग्यू, लेप्टो, स्वाइनच्या विळख्यात सापडले असून महिनाभरांपासून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. कावीळ, गैस्ट्रो, मलेरिया, डेंग्यू बाधीत रुग्णांची संख्या वाढत असून धक्कादायक बाब म्हणजे लेप्टो आणि डेंग्यूमुळे महिनाभरात ११ जणांचा जीव गेला आहे. साथीचे आजार आटोक्यात आणण्यासाठी २४ तास आरोग्य यंत्रणा कार्यरत ठेवली असल्याचा दावा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने केला आहे.
यंदाच्या पावसाळ्यात कल्याण डोंबिवलीकराना दोनदा पुराचा सामना करावा लागला . या काळात तापाने फणफणलेल्या तीन हजार रुग्णावर पालिकेच्या रुग्णालयांत उपचार करण्यात आले. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात होती मात्र पावसाने काही दिवसांपासून उघडीप देताच साथीच्या आजारांनी पुन्हा डोके वर काढले आहे.कावीळ, गैस्ट्रो, मलेरिया, डेंग्यू बाधीत रुग्णांची संख्या वाढत असून धक्कादायक बाब म्हणजे लेप्टो आणि डेंग्यूमुळे महिनाभरात ११ जणांचा जीव गेला आहे.साथीचे आजार आटोक्यात आणण्यासाठी आणि या रोगांचा फैलाव वाढू नये यासाठी आरोग्य यंत्रणा २४ तास सतर्क ठेवण्याचा महत्वपूर्ण निर्णय कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. कल्याणमधील रुक्मिणीबाई आणि डोंबिवलीतील शास्त्रीनगर दवाखान्यात उपचारासाठी रुग्नांची गर्दी वाढत आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने साथीच्या आजारांपासून संरक्षण व्हावे यासाठी लसीकरण, जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. स्वच्छता मोहीमेचा दैनंदिन आढावा घेतला जात असून डास प्रतिबंधक जंतुनाशक फवारणी केली जात आहे.
आजार निहाय रुग्ण
गॅस्ट्रो – १७७ , कावीळ – १६९ , टायफाइड – ४४७ , मलेरिया – १६१ , डेंग्यू – २९३ , लेप्टो – १७ , स्वाईन फ्लू – ५३ .