ठाणे

जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मतदान यंत्रांची प्रथम सरमिसळीकरण प्रक्रिया पूर्ण

मतदान यंत्रांचे विधानसभा मतदारसंघनिहाय वितरण

ठाणे दि. ३०: विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी विविध ठिकाणाहून जिह्याला प्राप्त झालेल्या मतदान यंत्रांच्या प्रथम सरमिसळीकरणाची प्रक्रिया (फर्स्ट रॅण्डमायझेशन) संगणकीय प्रणालीच्या सहाय्याने आज जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश नार्वेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आली.यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी अपर्णा सोमाणी, उपजिल्हाधिकारी मनोज गोहाड, ईव्हीएम व्यवस्थापन समितीचे नोडल अधिकारी संदीप माने यांच्यासह राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या मतदानयंत्रांमधून प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय मतदान केंद्राच्या संख्येच्या १२० टक्के बॅलेट युनिट, ११३ ते ११५ टक्के कंट्रोल युनिट, मतदान केंद्रांच्या संख्येच्या १२७टक्के व्हीव्हीपॅट याप्रमाणात मतदान यंत्रांचे वितरण करण्यासाठी प्रथम सरमिसळीकरण प्रक्रिया राबविण्यात आली. त्यानुसार तुर्भे येथिल स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आलेल्या मतदान यंत्रांचे विधानसभा मतदारसंघ निहाय वितरण केले जाणार आहे.
दुसऱ्या टप्प्यातील सरमिसळ प्रक्रिया विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावर होणार असून त्याद्वारे मतदान यंत्रांचे मतदान केंद्रनिहाय वितरण केले जाईल असे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले .

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!