ठाणे

जिल्ह्यात आज एक उमेदवारी अर्ज दाखल

ठाणे दि ३० सप्टेंबर २०१९ : विधानसभा निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशी १४१ उल्हासनगर मतदार संघामधे एक उमेदवारी अर्ज भरण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली.

१४१ उल्हासनगर मतदार मतदार संघामध्ये मिलिंद काशिनाथ कांबळे ( अपक्ष ) यांनी आज उमेदवारी अर्ज भरला आहे. आज अखेर पर्यंत १४१ उल्हासनगर मतदारसंघात २ अर्ज भरण्यात आले आहेत. उर्वरित १७ मतदार संघामध्ये अद्याप एकही उमेदवारी अर्ज प्राप्त झालेले नाही. अर्ज भरण्याची शेवटची तारीख ४ ऑक्टोबर आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!