ठाणे

जिल्ह्यात होणार प्लास्टिक बंदीसाठी महाश्रमदान

२ ऑक्टोबर रोजी साजरा होणार स्वच्छ भारत दिवस

ठाणे दि ३० सप्टेंबर २०१९ : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्ताने २ ऑक्टोबर रोजी स्वच्छ भारत दिवस साजरा करण्यात येणार आहे. या दिवसाचे औचित्य साधत स्वच्छता हि सेवा या अभियाना अंतर्गत ठाणे जिल्हाच्या ग्रामीण भागात ठीकठिकाणी प्लास्टिक कचरा गोळा करण्यासाठी महाश्रमदान करण्यात येणार आहे.  या उपक्रमाचा जिल्हास्तरीय शुभारंभ ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांच्या उपस्थितीत भिवंडी तालुक्यातील लोनाड ग्रामपंचायतीमध्ये करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमा दरम्यान लोनाड येथील शाळेत सॅनिटरी नॅपकीन डिस्पोजेबल मशीन बसवण्यात येणार आहे. तसेच कायमस्वरूपी प्लास्टिक बंदी व्हावी यासाठी कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात येणार आहे. त्याचबरोबर विविध वृक्षाचे रोपण करण्यात येणार आहे. तसेच सोनखत उपसा व एक खड्डा शौचालयाचे दोन खड्डा शौचालयात  रुपांतर करणाऱ्या लाभार्थांच्या सत्कार सोहळा आणि शाळेतील मुलांची स्वच्छता दिंडी काढण्यात येणार आहे. अशी माहिती उप मुख्य कार्यकारी अधिकरी ( स्वच्छता व पाणी ) छायादेवी शिसोदे यांनी दिली.

हा उपक्रम जिल्ह्यातील कल्याण,अंबरनाथ, मुरबाड, भिवंडी आणि शहापूर या पाचही तालुक्यातील ग्रामपंचायत स्तरावर होणार आहे.  यासाठी जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची प्रत्येक तालुक्यासाठी नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. नेमण्यात आलेले अधिकारी ग्रामपंचायतीमध्ये जावून महाश्रमदानात सहभागी होणार आहेत.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!