डोंबिवली ( शंकर जाधव ) नवी दिल्ली येथे २९ सप्टेंबर २०१९ रोजी पार पडलेल्या इंडियास शायनिंग स्टार अवॉर्ड २०१९ या पुरस्काराने साकेत महाविद्यालयातील रोहित सिदराम भोरे यांना सन्मानित करण्यात आले. कराटे क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी व आंतराष्ट्रीय वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नाव नोंदविल्याबद्दल रोहितला या पुरस्कार देण्यात आला. युथ इंडिया डेव्हलोपमेंट बोर्ड या समिती कडून देण्यात आला. या कार्यक्रमाला युथ इंडिया डेव्हलोपमेंट बोर्डचे अध्यक्ष राजेश यादव व कॉर्डीनेटर मनीषा शर्मा व प्रमुख अथिती म्हणून व्राईटर श्री.आर.के.हंडा , प्रो रेसलर.गोपाल पराषाहर व (डी. एच.जी. पोलिस)डॉ.सुनील बोकोलिया यांच्या हस्ते हा पुरस्कार रोहितला देण्यात आला.
त्याच बरोबर साकेत महाविद्यालयाचे सचिव साकेत तिवारी, सीईओ शोभा नायर,मॅनेजमेंट कॉलेजचे निर्देशक सनोद कुमार ,साकेत कॉलेज चे प्राचार्य एस.के.राजू , उप प्राचार्य डॉ.शाहाजी कांबळे ,प्रा.नवनाथ मुळे , क्रीडा शिक्षक राजेंद्र तेले , प्रा.संजय चौधरी,प्रा.प्रिया नेर्लेकर व प्रा.शलाका चव्हाण व मनोज मोरे यांनी रोहितचे अभिनंद केले.