नवी मुंबई, दि.30 : विधानसभ निवडणूक 2019 साठी कोकण विभागातून एकूण 07 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. जिल्हानिहाय माहिती पुढील प्रमाणे.
ठाणे जिल्हयातून 01 अर्ज दाखल झाले. त्यात 141-उल्हासनगर विधानसभा मतदारसंघ श्री.मिलींद काशिनाथ कांबळे (अपक्ष) यांचा समावेश आहे. रायगड जिल्हयातून 05 अर्ज दाखल झाले. त्यात 192-अलिबाग विधानसभा मतदारसंघ श्री.सुभाष लक्ष्मण पाटील (अपक्ष), सुभाष जनार्दन पाटील (अपक्ष), श्री.सुभाष प्रभाकर पाटील (अपक्ष), श्री.सुभाष गंगाराम पाटील (अपक्ष), श्री.सुभाष दामोदर पाटील (अपक्ष) यांचा समावेश आहे. पालघर जिल्हयातून 01 अर्ज दाखल झाला. त्यात 132-नालासोपारा विधानसभा मतदारसंघ श्री.राकेश अरोरा (हिंदुस्थान जनता पार्टी) यांचा समावेश आहे. तसेच रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हयातून आज एकही अर्ज दाखल करण्यात आलेला नाही.
विधानसभा निवडणूक-2019 : कोकण विभागात आज 7 उमेदवारी अर्ज दाखल
