डोंबिवली ( शंकर जाधव ) प्रतिवर्षी विविध सांस्कृतिक उत्सवाचे माहेरघर असणाऱ्या श्रीधर म्हात्रे वाडीत यावर्षी नवरात्रोत्सवातील गरब्याचा आनंद लुटण्यासाठी तरुणाईची तोबा गर्दी होत आहे. पहिल्याच दिवशी रविवार असल्याने डोंबिवलीकर दांडिया प्रेमींची पावले म्हात्रे वाडीत वळत होती. प्रत्येक रात्री पैठणीचा लकी ड्रॉ सोडत असल्याने महिलांसाठी आकर्षणाचा विषय होत आहे.
श्रीधर म्हात्रे मित्र मंडळ आणि महिला आधाडी सार्वजनिक नवरात्रोत्सवाचे 14 वे वर्ष आहे. रविवारी सकाळी दुर्गादेवीची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी श्रीधर मित्र मंडळाचे अध्यक्ष तथा माजी स्थायी समिती सभापती जनार्दन म्हात्रे, नगरसेविका रेखा म्हात्रे यांनी यथासांग देवीची पूजा केली. यावेळी शिवसेना डोंबिवली युवा सेना विधानसभा अधिकारी राहुल म्हात्रे, आदित्य म्हात्रे, रोहित म्हात्रे, चेतन देशमुख, मिलिंद दुदवडकर, जयनाथ म्हात्रे, श्रीमती गुलाब म्हात्रे, प्रीती म्हात्रे, वैशाली म्हात्रे, अंजली म्हात्रे यांच्यासह म्हात्रे वाडीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवरात्रोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. विविध स्पर्धा, खेळ यांसह बक्षिसांची लयलूट केली जाते. तरुणाईसाठी फॅन्सी ड्रेस, अष्टमिच्या दिवशी असणाऱ्या महाभंडारात हजारो डोंबिवलीकर महाभंडाराचा लाभ घेतात. दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवात विविध क्षेत्रातील मान्यवर देवीचे दर्शन घेण्यासाठी म्हात्रे वाडीत येत असतात त्यावेळी त्यांचा सत्कार करून म्हात्रे परिवार त्यांचे स्वागत करतात ही प्रथा पूर्वीपासून सुरु असल्याने श्रीधर म्हात्रे वाडीतील नवरात्रोत्स शहरात कौटुंबिक उत्सव म्हणून ओळखला जात आहे.