ठाणे दि ३० सप्टेंबर २०१९ : गुजरात येथील साबरमती येथे २ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जंयती निमित्ताने संपन्न होणाऱ्या स्वच्छ भारत दिवस कार्यक्रमासाठी ठाणे जिल्ह्यातून स्वच्छतेच्या क्षेत्रात चांगले काम करणारे तब्बल २०० प्रतिनिधी २९ सप्टेंबर रोजी रवाना झाल्याची माहिती उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( पाणी व स्वच्छता ) छायादेवी शिसोदे यांनी दिली.
या कार्यक्रमासाठी रवाना झालेल्यांना ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनावणे यांनी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील अंगणवाडी कार्यकर्ती, आशावर्कर, स्वच्छग्रही, महिला बचत गटांच्या सदस्या, आदी प्रतिनिधी शिवशाही बसने रवाना झाले आहेत.
या कार्यक्रमात मा. पंतप्रधान महोदय सर्वांना संबोधित करणार आहेत. स्वच्छतेमधे विशेष कार्य करणाऱ्या दोन व्यक्तींचा सन्मान या निमित्ताने करण्यात येणार आहे.