ठाणे

ठाणे जिल्हातील तिसरे पोलीस अधिकारी निवडणुकीच्या आखाड्यात!!

अंबरनाथ विधानसभेतील मुलभूत सुविधांच्या अभावानेच निवडणुकीच्या रिंगणात – दिलीप जगताप

अंबरनाथ   (गौतम वाघ) : रविंद्र आंग्रे, प्रदीप शर्मा पाठोपाठ पोलीस प्रशासनातील नुकतेच निवृत्त झालेले पोलीस उपायुक्त दिलीप जगताप या कर्तव्यदक्ष अधिकार्‍याने अंबरनाथ विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उडी मारल्याने, त्यांच्या जबरदस्त संपर्क कौशल्याने, रंगतदार चुरस निर्माण झाली आहे.
उल्हासनगरातील मुस्लिम बांधवांचा कब्रस्तान चा रेंगाळत ठेवलेला ज्वलंत प्रश्न, ख्रिस्ती बांधवांचा कैलास कॉलनीतील पडझड अवस्थेतील “हाऊसफुल्ल”, दफनभूमी प्रश्न, यंदाच्या पावसाळ्यात कोसळलेल्या इमारती व मृत्यूमुखी पडलेल्या आणि बेघर झालेले रहिवासी, मृत्यूचा सापळा ठरलेल्या रस्त्यावरील खूनी खड्डे आणि त्यात ही अपघात होऊन मृत्यू झालेले पादचारी, ५ नं येथे मुंबई व इतर ठिकाणांहून आणून टाकलेल्या कचर्‍यामूळे जनतेच्या रोगराईं मध्ये असंख्य पटीने वाढ करणार्‍या डंपिंग ग्राउंड
च्या भयाण समस्यांनी ग्रस्त असलेल्या त्रस्त नागरिकांच्या हालअपेष्टांना पाहूनचं, निराकरण करण्याच्या उद्देशाने व ठाम निश्चयानेच निवडणूकीत उभे असल्याचे मत दिलीप जगताप यांनी उपस्थित पत्रकारां समोर मांडले. माझ्या ३५ वर्षांच्या प्रशासकीय सेवेत, हातात घेतलेली प्रत्येक केस ही यशस्वीरीत्या हाताळून पूर्ण करण्याचे कौशल्यच आत्मसात झाल्याने, नेमके त्याच दृष्टीने ही निवडणूक फत्ते करणार आणि माझ्या निवृत्ती काळातील आरामदायी जीवनशैली झुगारून केवळ जनतेच्या समस्या उच्चाटन करण्यासाठी आगामी काळ व्यतीत करणार असल्याचे जगताप यांनी सांगितले.
एका शिस्तबद्ध, कर्तव्यदक्ष आणि अभ्यासू व्यक्तीमत्वाने राजकारणात प्रवेश केल्याने, अंबरनाथ – उल्हासनगरकरांना, एका चांगल्या उमेदवाराचा पर्याय उपलब्ध झाला असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. त्यामुळे अंबरनाथ विधानसभा ही आता अटीतटीची होणार असल्याचे राजकीय जाणकारांनी मत व्यक्त केले आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!