डोंबिवली – ( शंकर जाधव ) कल्याण ग्रामीण मतदार संघातून शिवसेनेने विद्यमान आमदार सुभाष भोईर यांना उमेदवारी दिल्याने असंख्य शिवसैनिक नाराज झाले आहेत.सुभाष भोईर यांनी पाच वर्षात मतदार संघात शिवसैनिकांना विश्वात घेतले नाही, १४ गावात सुविधांचा आभाव, वाकलन गाव आणि डोंबिवली जवळील पाणी टंचाई या समस्या सोडविण्यास स्थानिक आमदार भोईर कमी पडले आहेत.म्हणून शिवसेनेने रमेश म्हात्रे यांनी पक्षाने दिली नाही तर आम्ही पक्षाचे काम करणार नाही. असा निर्धार बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषद शिवसैनिकांनी व्यक्त केला. पक्षाच्या या निर्णयाच्या विरोधात पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देणार असल्याचेही सांगितले.
मागील निवडणूकीत राष्ट्रवादीकडून शिवसेनेत आलेल्या सुभाष भोईर यांनाच पुन्हा शिवसेनेने कल्याण ग्रामीण मतदार संघातून उमेदवारी दिली असून यमुळे ग्रामीण भागातील शिवसैनिकामध्ये नाराजी पसरली आहे. या भागात मागील ५ वर्षात कोणतेही काम न करता खासदार शिंदे आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या कामाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न सुभाष भोईर यांनी केला आहे . स्वातंरट्याला ७२ वर्षे उलटली मात्र तरीही १४ गावातील नागतिकानी पिण्याचे पाणी नाही. आमदार म्हणून या भागातील पाण्याचा प्रश्न सोडविण्याचे कोणतेही प्रयत्न त्यांनी केलेले नसून कोणत्याही शिवसैनिकांना विश्वासात भोईर घेत नसल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला. वाकळण गावचे सरपंच अनिल भोईर, कल्याण ग्रामीणचे तालुकाप्रमुख एकनाथ पाटील यांच्यासह रमेश म्हात्रे यांच्या शेकडो समर्थक स्थानिक शिवसैनिकांनी सुभाष भोईर यांच्या विरोधात घोषणाबाजी करत आपला संताप व्यक्त केला तसेच आपल्या विरोधाचा पक्ष नेतृत्वाने विचार न केल्यास कोणत्याही परिस्थिती त सुभाष भोईर यांना या भागातून निवडून येऊ देणार नसल्याचा निर्धार केला.