ठाणे

अंबरनाथ विधानसभा मतदारसंघासाठी ३ उमेदवारी अर्ज दाखल

अंबरनाथ दि. ०३ (नवाज अब्दुलसत्तार वणू)
         १४० अंबरनाथ विधानसभा मतदार संघाच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता आजपर्यंत ३ उमेदवारांनी आपला नामनिर्देशन अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी संतोष जाधव यांच्याकडे दाखल केले आहेत,
         
अंबरनाथ विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीकरिता विधानसभा क्षेत्रातून आजपर्यंत ३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत, त्यात १) यतीन मोरे-(अपक्ष), २) सुबोध भारत (अपक्ष) व राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस महाआघाडीचे रोहित साळवे आदी उमेदवारांचा समावेश आहे. अपक्ष उमेदवार यतीन मोरे यांनी तिसऱ्या दिवशी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे अर्ज दाखल केला, तर सुबोध भारत यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करून आज आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, यावेळी समाजसेवक नजीर शेख उपस्थित होते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार रोहित साळवे यांनी देखील आज निवडणूक निर्णय अधिकारी संतोष जाधव यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी काँग्रेसचे अंबरनाथ शहराध्यक्ष प्रदीप नाना पाटील, जिल्हा उपाध्यक्ष ऍड. यशवंत जोशी, राष्ट्रवादीचे अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव पाटील, युवक जिल्हाध्यक्ष सचिन पाटील, नगरसेवक उमेश पाटील, महिला शहराध्यक्ष पूनम शेलार यांच्यासह अनेक मान्यवर व पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.
         उद्या म्हणजेच शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने शिवसेना, मनसे, वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या उमेदवारांसह किती उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करतात आणि नेमके किती उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरतील. याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!