ठाणे

घड्याळ्यांनी दिली पुन्हा कलानीला कुटुंबाला साथ

भाजपाने कलानी परिवाराच्या सदस्याला तिकीट नाकारल्यावर एका रात्रीत कलानी परिवार राष्ट्रवादीत

उल्हासनगर (गौतम वाघ) : दोन दिवसापुर्वी उल्हासनगर च्या आमदार ज्योती कलानी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सदस्य पदाचा राजीनामा होता, त्यानंतर बुधवारी भाजपची दुसरी यादी आली ,त्या यादीत उल्हासनगर विधानसभा मतदार संघात कुमार आयलानी यांचे नाव आले,त्यामुळे भाजप तिकीटा कडे डोळे लावून बसलेल्या कलानी परिवाराचा हिरमोड झाला,त्यानंतर काही वेळातच उल्हासनगर विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस च्या यादीत भरत गंगोत्री यांचे नाव आले,या घडामोडी नंतर कलानी परिवार “घरका ना घाट का झाला”,मात्र आज अचानक ज्योती कलानी दोन तीन कार्यकर्त्यांन बरोबर निवडणूक कार्यालयात जाऊन राष्ट्रवादी पक्षातर्फे आपला उमेदवारी अर्ज भरला,याबाबत शहरात कोणाला कानकुण सुद्धा लागली नाही,उद्या ज्योती कलानी यांचा मुलगा शक्ती प्रदर्शन करून आपला स्वतःचा अर्ज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सादर करणार असल्याचे स्वताः ओमी कलानी यांनी म्हटलं असून भाजपने आम्हाला वचन दिले होती,की आमच्या घरात आमदार की असल्याने आम्हालाच विधानसभेची भाजपा ची तिकीट जाईल मात्र ते वचन भाजपने न पाळता आम्हाला अंधारात ठेऊन दुसऱ्याला उमेदवारी घोषित केली, सकाळीच सकाळीच राष्ट्रवादी चे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या बरोबर ज्योती कलानी यांचं बोलणं झाल्यावर सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस चा आम्हाला ए बी फॉर्म देण्यात आला असून त्यात ज्योती कलानी आणि ओमी कलानी ही दोन नावे लिहण्यात आली आहे. उद्या शक्तीप्रदर्शन करून मी स्वता माझा उमेदवारी अर्ज भरणार,अस ओमी कलानी यांनी पञकारांना सांगितले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!