ठाणे

कल्याण डोंबिवलीतील चार विधानसभा क्षेत्रात राजकीय पक्षांसह अपक्ष मिळून ५४  उमेदवार  रिंगणात

डोंबिवली (  शंकर जाधव  ) उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी कल्याण डोंबिवली मधील चारही विधानसभा क्षेत्रातील चित्र स्पष्ट झाले असून शिवसेना भाजप महायुती ,मनसे,कोंग्रेस ,अपक्ष असे मिळून एकूण ५४  उमेदवार  रिंगणात आहे .कल्याण ग्रामिन व डोंबिवलीत बंडखोरी नसली तरी कल्याण पूर्व, पश्चिम मधील निष्ठा प्रतिष्ठा आणि बंडखोरीचा लढतीत कोण बाजी मारतो हे निकालाअंती स्पष्ट होणार आहे .
          विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर कल्याण डोंबिवलीत एकच रणकंदन सुरू झाले .कल्याण ग्रामिन मतदारसंघात नाट्यमयरित्या विद्यमान आमदार सुभाष भोईर याना उमेदवारी डावलून रमेश म्हात्रे यांना या देण्यात आली . कल्याण ग्रामीण मधून माघारी अंती एकूण १२  उमेदवार रिंगणात असून मुख्य लढत महायुतीचे शिवसेनेचे रमेश म्हात्रे व मनसेचे राजू पाटील यांच्यात लढत होणार आहे .कल्याण पूर्वेत महायुतीचे भाजप चे आमदार गणपत गायकवाड यांच्या विरोधात शिवसेनेचे धनंजय बोराडे यांनी दंड थोपटले तर कल्याण पश्चिम मध्ये भाजपची जागा शिवसेनेने हिरावून घेत शिवसेनेकडून शहर प्रमुख विश्वनाथ भोईर याना उमेदवारी बहाल करण्यात आली .यामुळे भाजपचे विद्यमान आमदार नरेंद्र पवार यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला .आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातुन माघारी अंती महायुतीचे भाजपचे उमेदवार आमदार गणपत गायकवाड यांच्यासह शिवसेनेचे बंडखोर धंनजय बोडारे ,राष्ट्रवादीचे प्रकाश तरे ,वंचित आघाडीच्या आश्विनी धुमाळ यांच्यासह १९  उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत .कल्याण पश्चिम मध्ये महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार विश्वनाथ भोईर,भाजपचे बंडखोर आमदार नरेंद्र पवार ,मनसेचे प्रकाश भोईर ,काँग्रेसच्या कांचन कुलकर्णी यांच्यासह १७  उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत .डोंबिवली मतदारसंघात एकुन ६  जण निवडणूक रिंगणात असून त्यामध्ये भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण ,मनसेचे मंदार हळबे,कोंग्रेसच्या राधिका गुप्ते यांच्यात लढत होणार आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!