भरारी पथकाने पकडले दोन लाख दहा हजार रुपये
October 8, 2019
38 Views
2 Min Read

-
Share This!
मंगळवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास चाविंद्रा तपासणी नाका येथे शहरात येणाऱ्या वाहनांची तपासणी करत असताना वाहन क्रमांक एम एच ४८ एके ३७८६ सफेद एरटिगा मारुती कार या वाहनांची तपासणी केली असता यामध्ये रक्कम रुपये २ लाख १० हजार रुपये आढळून आले याबाबत वाहन चालकाकडे चौकशी केली. त्यावेळी वाहन चालकाने या रकमेबाबत कोणत्याही प्रकारा समाधानकारक खुलासा केला नाही. त्यामुळे १३७ भिवंडी पूर्वचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर मोहन नळदकर यांनी ही रक्कम जप्त करून भिवंडी उपकोषागार स्ट्रॉंग रूममध्ये जमा करण्याचे आदेश दिले. त्यानुसार ही रक्कम जमा करण्यात आली आहे. याकामी अचारसहिंता नोडल अधिकारी पंढरीनाथ वेखंडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आचारसहिता व्यवस्थापन प्रमुख सुभाष झळके, एफएसटी पथक क्रमांक एकचे पथक प्रमुख मंगेश राजाराम गोरे, सहाय्यक पथक प्रमुख महेंद्र मोहिते, पोलीस कर्मचारी संजय कोळी इत्यादी आचारसहिंता पथकाने ही कारवाई केली. आचारसंहिता लागू झाल्याने नागरिकानी, व्यापाऱ्यांनी नियमानुसार रुपये पन्नास हजार जवळ ठेवावी, रुपये ५० हजार रकमेपेक्षा जास्त रक्कम घेऊन फिरू नये किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम असल्यास त्याबाबतची कागदपत्र जवळ बाळगावी असे, आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर नळदकर यांनी केले आहे.