केडीएमसी आणि उल्हासनगर मधील एकुण २६ नगरसेवकांचे राजीनामे…
पक्ष अडचणीत येऊ नये म्हणून दिले राजीनामे…
कल्याण (गौतम वाघ) : कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघात शिवसेना आणि भाजप मध्ये चांगलीच जुंपली आहे. हि जागा भाजपला देण्यात आली मात्र शिवसेनेने या जागेवर आपला दावा ठोकत विद्यमान आमदार आणि भाजप चे उमेदवार गणपत गायकवाड यांना विरोध करत शिवसैनिक पुरस्कृत बंडखोर उमेदवार धनंजय बोडारे यांना उभे केल आहे. पक्ष अडचणीत येऊ नये यासाठी कल्याण पूर्वेतील शिवसेनेचे १६ नगरसेवक तसेच उल्हासनगर मधील १० नगरसेवक म्हणजे कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघात येणाऱ्या २६ नगरसेवकांनी आपला राजीनामा पक्षप्रमुख, पालकमंत्री, जिल्हाप्रमुख आणि खासदार श्रीकांत शिंदे यांना पाठविला आहे. एवढेच नाही तर पक्षाच्या सर्व सेलच्या पदाधिकाऱ्यांनी देखील राजीनामे दिले आहे. या राजीनाम्यानंतर शिवसेनेची काय भूमिका असेल हे पाहणे औचित्याचे ठरले आहे.