उल्हासनगर(गौतम वाघ): विजयाच्या उंबरठ्यावर असलेल्या १४० अंबरनाथ विधानसभा क्षेत्रात मनसेच्या उमेदवाराला पक्षातील पदाधिकार्यां मध्येच गटबाजीच ग्रहण,उल्हासनगर शहरातील २१ वॉर्डांचा समावेश आणि अंबरनाथ शहर मिळून १४० अंबरनाथ विधानसभा क्षेत्र अस्तित्वात आलेलं आहे,देशात आणि राज्यात भाजप च्या दडपशाहीला घाबरून इतर पक्षातील आमदार,खासदार,मोठं-मोठी पदाधिकारी मंडळी भाजप च्या वळचणीला जात असतांना समाजकार्याची आवड असणारे,भाजप पक्षाचे उल्हासनगर उद्योग प्रकोष्ट शाखेचे शहर अध्यक्ष असलेले सुमेधजी भवार यांनी भाजप मधून मनसेत प्रवेश केला आणि मनसे कडून विधानसभेची निवडणूक लढविण्यासाठी मैदानात उतरलेले आहेत,मंत्री,माजी मंत्री, खासदार,आमदार,नामदार हे भाजप च्या प्रवाहात विलीन होऊन वाहत आहेत,परंतु या आक्रमक परंतु संयमी आणि समजदार तरुणाने प्रवाहाच्या विरोधात जाण्याचा मार्ग स्वीकारला आणि सरकारच्या प्रत्येक चुकांवर बोट ठेवून रस्त्यावर उतरून आंदोलन करणाऱ्या मा.राज साहेब ठाकरे यांच्या मनसेचा पर्याय स्वीकारला आणि सलग १० वर्षे आमदार असणाऱ्या भाजप-सेना युतीचे उमेदवार बालाजी किणीकर यांना विधानसभा निवडणुकीत चारी मुंड्या चित करण्याचा चंग बांधुन,सुरुवातीपासूनच प्रचारात आघाडी घेणाऱ्या सुमेधजी भवार यांना मोठ्या प्रमाणात भाजपच्या लोकांचा छुपा पाठिंबा असल्याचे बोलले जात आहे,परंतु मनसेच्या पदाधिकाऱ्यांची आपापसातील नाराजी आणि हेवेदावे व शिवसेनेच्या उमेदवाराला असलेला अंतर्गत छुपा पाठिंबामुळे सुमेध भवार यांची डोकेदुखीत वाढ होण्याची शक्यता आहे, तरी उल्हासनगर शहरातील जिल्हाध्यक्ष सचिन कदम,उपजिल्हाध्यक्ष प्रदिप गोडसे, शहर अध्यक्ष बंडू देशमुख आणि विध्यार्थी सेनेचे मनोज शेलार यांचे आपापसांतील हेवे दावे मिटले तरच सुमेध भवार यांचा विजय सुखद होणार आहे, अन्यथा मनसेच्या पदाधिकाऱ्यांची गटबाजी हीच मनसेच्या पराभवाला कारणीभूत ठरणार आहे,
अंबरनाथ मधुन शिवसेनेला कडवी झुंज देणाऱ्या सुमेध भवार यांना मनसेतील गटबाजी भोवणार?
October 11, 2019
189 Views
2 Min Read

-
Share This!