मनसेच्या जाहीर सभेत सरकारला प्रश्न…..
डोंबिवली : ( शंकर जाधव ) महाराष्ट्रातील विधानसभेत शिवसेना-भाजपचे नेते काश्मीर मधील ३७० कलम हटवण्याच्या मुद्द्याला प्रचाराचा मुख्य भाग बनवला आहे.परंतु राज्यातील मुद्द्यावर बोलण्यास हे नेतेमंड तयार नाहीत. भाजपच्या एका ज्येष्ठ मंत्र्याने डोंबिवली शहर घाणेरडे शहर असल्याचे बोलून डोंबिवलीकरांचा अपमान केला आहे. तरीही डोंबिवलीकर शांत का ? डोंबिवलीतील असुविधांचे ३७० कलम कधी हटवणार ? असा प्रश्न मनसे उमेदवार मंदार हळबे यांनी जाहीर सभेत सरकारला केला.तर या सभेत मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनीनाशिकचा मनसेने कश्याप्रकारे कायापालट केला याची माहिती दिली.
डोंबिवलीत मनसे उमेदवार मंदार हळबे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या जाहीर सभेत मनसे नेते अविनाश अभ्यंकर आणि प्रदेश सचिव राजन गावंड बोलत होते.यावेळी उपाध्यक्ष तथा डोंबिवली शहर अध्यक्ष राजेश कदम,महिला अध्यक्षा मंदा पाटील, यासह राहुल कामत,दीपिका पेंडणेकर,अॅड.सुहास तेलंग,प्रल्हाद म्हात्रे आदी पदाधिकारी उपस्थित होते.या सभेत डोंबिवलीतील बंद पडलेल्या प्रकल्पावर राजेश कदम यांनी प्रकाश टाकला.बंद असलेला कोपर पूल,रिंगरुट, रखडलेला मानखोली पूल,कल्याण पत्रीपूल, ६ वर्षापासून बंद असलेले सूतिकागृह या व अश्या अनेक समस्यांवर सत्ताधारी अपयशी ठरल्याचे सांगितले. मनसे उमेदवार मंदार हळबे यांनी डोंबिवलीच्या अवस्थेला शिवसेना-भाजप जबाबदार असल्याचे सांगितले.डोंबिवलीच्या असुविधांचे ३७० कलम हे सरकार कधी हटवणार असा जाहीर प्रश्न सभेत उपस्थित केला. मनसे अविनाश अभ्यंकर यांनी नाशिकला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सत्ता असताना नाशिकचा कायापालट झाला. मनसेच्या महापौराचा अमेरिकेत सत्कार करण्यात आला. तरही मनसेने नाशिकमध्ये काय केले हे विचारले जाते.डोंबिवलीची जी आज परिस्थिती डोंबिवलीकरांनी सत्ताधाऱ्यांना जाब विचारला पाहिजे.प्रदेश सचिव राजन गावंड यांनी आपला देश इंद्र्लोकात आहे काय अश्या शब्दात खिल्ली उडवली.
रेल्वे अपघातातील ८२ बळीला जबाबदार कोण ?
डोंबिवली ते ठाणे रेल्वे स्थानकादरम्यान चार महिन्यात ८२ प्रवाश्यांचे बळी गेले. याला जबाबदार कोण असा प्रश्न यावेळी उमेदवार मंदार हळबे यांनी या सभेत उपस्थित केला.रेल्वे प्रवाश्यांना सोयी-सुविधा देण्याची जबाबदारी या सरकारची असूनही त्यांनी आजवर डोंबिवलीला काय दिले ? असेही हळबे यांनी सभेत सांगितले.