ठाणे : नवरात्र उत्सवात सोळा वर्षीय मुलाचे अपहरण झाल्याची घटना दिवा शहरात घडली आहे.श्री दिनेश मारुती पठाडे राहणार गुलमोहर बिल्डिंग रूम 308/3 विकास म्हात्रे गेट, मातोश्री नगर, दिवा पुर्व , ठाणे यांचा मुलगा कु.किशन पठाडे (वय १६) हा ५ ऑक्टोबर रोजी गरबा खेळण्यास संदीप ग्यालसी, बी आर नगर, दिवा पुर्व येथे रात्री ८ वाजता गेला असता तो आजपर्यंत आला नाही व त्याचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केले असल्याची फिर्याद वडील दिनेश पठाडे यांनी मुंब्रा पोलिस स्टेशन गुन्हा क्र ८५७/ २०१९ कलम ३६३ प्रमाणे दाखल असून पोलिस शोध घेत आहेत. तसेच कोठे आढळून आल्यास तत्काळ पोलिस संपर्क साधा .प्रकरणी वरीष्ठ पोलिस निरीक्षक श्री मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी एस व्ही सरडे (PSI) तपास करत असून सदर वर्णनाचा मुलगा कुणाला आढळून आल्यास अधिक माहितीसाठी पोलिस नियंत्रण कक्ष ठाणे – 022 25443636 तसेच मुंब्रा पोलिस स्टेशन – 022 25468315 यांच्याशी संपर्क साधावा.
दिवा शहरातून मुलाचे अपहरण
October 11, 2019
134 Views
1 Min Read

-
Share This!