ठाणे

निवडणुकीनंतर विरोधी पक्षाचे दुकान बंद होते..

खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांची मनसेवर टीका

डोंबिवली : ( शंकर जाधव  ) जनतेवर अन्याय होत असेल तर शिवसेना नेहमी रस्त्यावर उतरली आहे. जनतेसाठी शिवसेनेची शाखा ३६५ दिवस २४ तास सुरु असते. मात्र निवडणुकीत जनतेला दाखवायचे म्हणून दुकान सुरु करतात.निवडणुका झाल्यावर विरोधी पक्षाचे दुकान बंद होते, अश्या शब्दात कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघात युतीचे उमेदवार रमेश म्हात्रे यांच्या मानपाडा रोड येथील कल्याण ग्रामीण निवडणूक कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी नाव घेता मनसेवर टीका केली.

या कार्यालयाचे उद्घाटन राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, महापौर विनिता राणे, ठाणे महानगरपालिकेचे उपमहापौर रमाकांत मढवी तालुका प्रमुख प्रकाश म्हात्रे, विधानसभा संघटक एकनाथ पाटील, डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे, कल्याण ग्रामीण विधानसभा संघटक कविता गावंड, विधानसभा संघटक तात्यास माने महिला शहरसंघटक डो.(पूर्व) मंगला सुळे, महिला शहरसंघटक डो.(पश्चिम) किरण मोंडकर, उपमहापौर मोरेश्वर भोईर, नितीन पाटील, नंदु परब, दिपेश म्हात्रे, जनार्दन म्हात्रे, संजय पावशे, शिवसेना- भाजपा मित्र पक्षाचे  पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी राज्यमंत्री चव्हाण यांनी शिवसेना – भाजपा – महायुतीची हवा बदलणार असे बोलणारे विरोधक संध्या त्यांचीच हवा गेल्याचे दिसत आहे असा टोला राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी लगावला. तर उमेदवार रमेश म्हात्रे म्हणाले,हे प्रचार कार्यालय माझे नसून सर्व शिवसेना-भाजप महायुतीच्या प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्याचे असल्याचे सांगितले.खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले, लोकसभेच्या निवडणुकीत याच मतदार संघात मला सुमारे ९० हजारांचा मताधिक्य होते.त्यामुळे रमेश म्हात्रे याचा विजय निश्चित आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!