मुंबई : मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी अनेक शालेय उपक्रमांना अत्यंत महत्त्व देणारी भांडुप, नरदासनगर येथील श्री सरस्वती विद्यामंदिर ही शाळा होय. नवराञामधये सरस्वती देवीचा उत्सव मोठ्या थाटात केला जातो. सरस्वती देवीच्या मंदिराची आकर्षक सजावट केली जाते. याबरोबर मुलांच्या बौद्धिक क्षमतेला चालना देण्यासाठी एक विषय घेऊन त्याची उत्तम प्रकारे मांडणी करण्यात येते. यावर्षी ‘ चांद्रयान – 2’ हा भारतीयांच्या अभिमानाचा विषय घेण्याचे ठरले.
शाळेच्या संचालिका आदरणीय सौ. वर्षा सावंत मॅडम या संकल्पने साठी मार्गदर्शक व प्रेरणास्रोत म्हणून उभ्या राहिल्या.
समीर सरांनी सुरेख अक्षरात लेखन केले. अत्यंत आकर्षक शीर्षक ही तयार केले. पूजा, अनघा, संध्या, पुष्पा, प्रेरणा व रुधिता मॅडम यांनी सुरेख फुले, पाने तयार करून देखणी आहे सजावट आणि केली. सर्व सेवक वर्गाने सरस्वती मंदिराची स्वच्छता केली. पंकज या माजी विद्यार्थ्याने देवीला आकर्षक रंग दिला. महाजन सरांनी ‘चांद्रयान – 2’ या मोहिमेवर समर्पक कविता रचली. गौरी मॅडमनी वळणदार अक्षरात ही कविता फलकावर लिहिली.
‘चांद्रयान – 2’ संदर्भातील कात्रणे, फोटो व माहितीचे संकलन ऋतु मॅडम यांनी केले. सोमा वारिसे या चौथी गुलाब वर्गातील पालकांनी या थीमची बॅकग्राऊंड सजावट मनोवेधक रंगीत पेपर लावून केली. एवढेच नव्हे तर चांद्रयान मोहिमेच्या व अंतराळवीरांच्या नमस्कार बारा फोटोंना देखण्या फ्रेम कल्पकतेने करून दिल्या. दत्ता पवार सरांनी सर्व माहितीचे संकलन केले. त्यांचा माजी विद्यार्थी छायाचित्रकार हितेश पराडकर याने बारा अप्रतिम फोटो प्रिंट दिल्या. तर सर्वांचे लक्ष खेचून घेणार्या रोव्हर व राॅकेट यांच्या प्रतिकृती प्रशांत ने हुबेहुब, अत्यंत कल्पकतेने करून दिल्या.
सरस्वती पूजनाची तयारी माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका छाया कुरकुटे यांनी सर्व शिक्षकांच्या मदतीने केली. वाळवे सर, धुरी सर, सुनिता, संगीता मॅडम आणि विद्यार्थी यांनी सुरेल आरती रोज सादर केली. प्रसिद्ध गायक व वादक किरण खोत यांनी त्यांच्या गायनाने बहार आणली. सुप्रसिध्द ढोलकी वादक हेमंत यांनी उत्तम साथ दिली.
संस्थेचे अध्यक्ष श्री. वसंत सावंत यांनी हा उपक्रम यशस्वी करणार्या सर्वांचे कौतुक केले. सर्व मुले, शिक्षक, पालक यांनी या उपक्रमास भेट दिली.
सरस्वती देवीच्या उत्सवासाठी केलेले हे सर्व प्रयत्न सर्वांच्या चर्चेचे विषय ठरले हे विशेष!!
भांडुपच्या श्री सरस्वती विद्यामंदिरात चांद्रयान – 2 अवतरले!
