सिंधुनगर घोषणेचा विरोध दर्शवुन मुख्यमंत्र्यांनी पाकिस्तानात जाऊन निवडणूक लढवावी- मनसे*
*सिंधुनगरची मुख्यमंञ्यांची घोषणा भोवणार कुमार आयलानीला !
उल्हासनगर(गौतम वाघ) : उल्हासनगर शहरातील रस्ते बनविण्याची आवश्यकता असून सिमेंट काँक्रीट रोडसाठी आत्तापर्यंत ८० करोड,भुयारी गटारे योजनेसाठी ८५ करोड,कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी ३२ करोड,दलित वस्ती सुधार योजना २५ करोड निधी देण्यात आल्याचे फडणवीस म्हणाले.उल्हासनगरचे संपूर्ण रस्ते काँक्रीटचे बनविणार असून कल्याण भिवंडी नंतर उल्हासनगरात मेट्रो आनणार आहे, व मेट्रो स्टेशन चे नाव सिंधुनगर ठेवणार असल्याची घोषणा त्यांनी दिली.पण मुख्यमंत्र्यांनी मेट्रो स्टेशनला सिंधुनगर नाव देण्याची घोषणा केल्याने मराठी,सिंधी वाद पुन्हा एकदा ऐरणीवर आणल्याने मराठी सिंधी मतांचे ध्रुवीकरण होणार आहे.सिंधुनगर या नावाला शिवसेनेचा गेल्या अनेक वर्षान पासुन विरोध आहे या साठी शिवसेनेने अनेक मोर्च आंदोलन ही केली होती शिवसेनेच्या अस्मितेचा विषय असलेल्या उल्हासनगराच्या नावाला राज्याचे मुख्यमंञांना ऐवढ्या कळवटा का ? काही महिन्या पुर्वीस उल्हासनगर चे नाव सिंधुनगर करण्याचा उमनपा महासभेतील प्रस्तावास युतीच्या शिवसेनेने कसून विरोध केला होता.
मराठी अस्मितेची हिच भुमिका मनसेची सुध्दा आहे,यासाठी मनसेने ही वेळोवेळी आवाज उठवला आहे.या विषयाची मनसेच्या शहर अध्यक्ष बंडु देशमुख ह्यांच्याची संपर्क केला असता त्यांनी सांगितले की सिंधीं समाजाचा आम्ही आदर करतो व मुख्यमंञाचा वक्तव्याचा जाहीर निषेध करत असुन मुख्यमंञ्यांना ऐवढाच पुळका येत असेल आणि मराठी माणसं नको असतील तर मुख्यमंञ्यानी महाराष्ट्रात निवडणुक न लढवता पाकीस्तानात जाऊन लढवावी असा गर्भीत इशारा मनसेने दिलेला आहे. पण आजच्या मुख्यमंत्री यांच्या घोषणेने कुमार आयलानी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता असून मराठी मतदानाचा फटका त्यांना बसणार असल्याचे राजकीय जाणकारांनी मत व्यक्त केले आहे.