ठाणे

डोंबिवलीत मतदान जनजागृती करताना रेल्वे सुरक्षा बलाची आडकाठी…

लेखी परवानगी नसल्याने केली चौकशी …

डोंबिवली  लोकशाही प्रक्रियेत निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून स्थानिक संस्था, निवडणूक आयोग जनजागृती करित आहे.

हा हेतु लक्षात घेउन कल्याण डोंबिवली कुंभार समाज सेवेने मतदान जनजागृती साठी डोंबिवली स्थानकात प्रचार केला.
कल्याण डोंबिवली कुंभार समाज सेवेचे संस्थापक दिनकर छत्तीसकर,अध्यक्ष जयंत कमळे,सेक्रेटरी विनायक सिंदरकर,मृणाल अंजर्लेकर यांसह सदस्य किशन कुंभार, रमाकांत गोरे, स्वप्नील सोनावणे आणि शशिकांत सोनावणे उपस्थित होते.यावेळी मतदान जनजागृती करित असताना त्यांना रेल्वे सुरक्षा बलाच्या दोन जवानांनी अटकाव केला.
सायंकाळी वर्दळीच्या वेळेस रेल्वे प्रवाशांची संख्या अधिक असल्याने मतदान जागृतीबाबत संस्थेच्या वतीने बँनर, प्लाय कार्ड घेउन प्रचार करण्यात येत असताना डोंबिवली स्थानकातील
एका रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांने संस्थेच्या कार्यकर्ते यांना हटकले. हा रेल्वे परिसर आहे. याची तुम्ही पूर्व परवानगी घेतली आहे का? स्टेशन प्रबंधकांना सूचना दिली आहे का? अशी विचारणा केली.रेल्वे सुरक्षा बलाने अशी उलट तपासणी सुरु केल्याने संस्थेचे पदाधिकारी आणि सदस्य बुचकळ्यात पडले.आम्ही कोणता गुन्हा केला असा प्रश्न त्यांना पडला.जनजागृती चा हा कार्यक्रम गुंडाळावा कि काय अश्या परिस्थितीत संस्थेचे पदाधिकारी होते. रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी संस्थेचे संस्थापक दिनकर छत्तीसकर आणि काही पदाधिकाऱ्यांना रेल्वे प्रबंधक कार्यालयात चौकशीसाठी नेले.रेल्वे प्रबंधक कार्यालयात संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी मतदान जनजागृती करत असल्याचे सांगितल्यावर त्यांना जाण्यास सांगितले.त्यानंतर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी रेल्वे पुलावर मतदान जनजागृती केली.दरम्यान या वेळी संस्थेला आलेल्या या अनुभवाबाबत स्वप्नील सोनावणे यांनी आश्चर्य व्यक्त केले.

( शंकर जाधव- डोंबिवली )

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!