ठाणे

मुख्यमंञ्याचा बाप जरी आला तरी नाव बदलु शकत नाही मनसेचा सज्जड दम

उल्हासनगर शहरासाठी करोडो रुपये निधीच्या “गाजराची” मनसेने उडवली खिल्ली…

मुख्यमंत्री ” मटकाकिंग ” आहेत का?

उल्हासनगर(गौतम वाघ):-  उल्हासनगरात भाजपा उमेदवार कुमार आयलानी ह्यांचा प्रचार सभेला मुख्यमंत्री देवेंन्द्र फडवणीस हे आले होते.यावेळी मुख्यमंञ्यानी उल्हासनगर शहरातील रस्ते बनविण्याची आवश्यकता असून सिमेंट काँक्रीट रोडसाठी आत्तापर्यंत ८० करोड,भुयारी गटारे योजनेसाठी ८५ करोड,कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी ३२ करोड,दलित वस्ती सुधार योजना २५ करोड निधी देण्यात आल्याचे फडणवीस म्हणाले.उल्हासनगरचे संपूर्ण रस्ते काँक्रीटचे बनविणार असून कल्याण भिवंडी नंतर उल्हासनगरात मेट्रो आनणार आहे.मेट्रो स्टेशन चे नाव सिंधुनगर ठेवणार असल्याची घोषणा त्यांनी दिली.पण मुख्यमंत्र्यांनी मेट्रो स्टेशनला सिंधुनगर नाव देण्याची घोषणा केल्याने मराठी,सिंधी वाद पुन्हा एकदा ऐरणीवर आणल्याने मनसेने आज मुख्यमंञ्याचा जाहीर निषेध केला.
मुख्यमंञ्यानी उल्हासनगर शहरासाठी करोडो रुपये निधीच्या “गाजराच्या” वक्तव्याची मनसेने उडवली खिल्ली
“मुख्यमंत्री हे मटकाकिंग” आहे प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या प्रकारचे आकडे सांगुन लोकांची दिशाभुल करता.आकडे न सांगता राहिलेले काम पुर्ण करा.उल्हासनगरात मेट्रो प्रकल्पाचे गाजर दाखवुन उल्हासनगर चे सिंधुनगर करणार तुम्ही तर काय तुमचा बाप जरी आला तरी नाव बदल होणार नाही.दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम मुख्यमंत्री करत असुन मुख्यमंञावर आचार संहितेचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मनसेने यावेळी केली आहे.ह्या आंदोलनात जिल्हाध्यक्ष सचिन कदम,प्रदिप गोडसे,संजय घुगे,शहर अध्यक्ष बंडु देशमुख मेन्नुदीन शेख,शैलश पांडव,काळु थोरात,सुभाष हटकर,शालीग्राम सोनवणे व इतर मनसे पदाधिकारी उपस्थित होते.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!