सब का साथ, सब का विकास नारा देणार्या भाजपाचा दुटप्पीपणा?
उल्हासनगर(गौतम वाघ) : उल्हासनगर मधील भाजपा पदाधिकारी,कार्यकर्ते,वरिष्ठ पदाधिकारी ह्यांना भाजपा प्रचार सभेच्या मंचा शेजारी आणि मंचावर स्थान न दिलेल्या व नेहमीच्या दुर्लक्षित व अपमानास्पद वागणूकीमुळे भाजपा विविध सेल, महिला मोर्चा व महत्वाचे जिल्हा पदाधिकारी, नेत्यांचा राजीनामा देत असल्याची अधिक माहिती हि सुञाकडुन मिळत आहेत ह्यात उत्तर भारतीय जिल्हाध्यक्ष :अनिल पांडे,
युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष :सुनील राणा,
अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष :कपील अडसूळ,ओ. बी. सी जिल्हाध्यक्ष :सुभाष तनावडे,साऊथ सेल चे सुरेश परीमल, ह्या राजीनामा सत्राने भाजपा उमेदवार कुमार आयलानींच्या अडचणीत अधिकच भर पडणार आहे. या आधीच ३७० कलम ऐवजी ३०७, लोकल मे ट्रॅफिक ज्यादा होता है, कमल को फुल दो, अशा वाक्यरचना करत भाषेचा पार चोथा करणार्या कुमार आयलानींमुळे सोशल मीडिया वर वारंवार व्हिडिओ वायरल करुन हंशाला रंगत आलेले आहे.