ठाणे

अंबरनाथ वॉर्ड क्रं. २३ संजयनगर येथील “निवडणूक प्रचार कार्यालयाचे” उदघाटन

अंबरनाथ दि. १४ (नवाज अब्दुलसत्तार वणू)   भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पी.आर.पी. आणि मित्र पक्ष महाआघाडीचे अधिकृत उमेदवार रोहित चंद्रकांत साळवे यांच्या “निवडणुक प्रचार कार्यालयाचा” उदघाटन सोहळा अंबरनाथ पश्चिमेकडील विलास जोशी यांच्या जनसंपर्क कार्यालय, संजयनगर येथे सोमवारी पार पडला. या कार्यालयाचे उदघाटन काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा निरीक्षक कॅप्टन निलेश पेंढारी यांच्याहस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन नगरसेवक विलास हरिभाऊ जोशी यांनी केले होते. आलेल्या मान्यवरांचा नगरसेवक विलास जोशी व ऍड. यशवंत जोशी यांनी सत्कार केला.
            याप्रसंगी महाआघाडीचे उमेदवार रोहित साळवे, काँग्रेसचे अंबरनाथ शहराध्यक्ष प्रदीप नाना पाटील, जिल्हा उपाध्यक्ष ऍड. यशवंत जोशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष सचिन पाटील, नगरसेवक पंकज पाटील, जिल्हा उपाध्यक्ष अनंत राजे, जमसू नजरत, रणजित ठाकूर, जाफर खान, समाजसेविका लताताई माने, राजू म्हेत्रे, विष्णू, कलीम शेख, राखी, राजू, महंमद यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
          कार्यालयाचा उदघाटनानंतर महाआघाडीचे उमेदवार रोहित साळवे यांनी वॉर्ड क्रं. २३ मधील संजयनगर येथील नागरिकांची भेट घेतली आणि संजयनगर येथील शितलामाता मंदिर येथे दर्शन घेतले. येथील नागरिकांनी त्यांना भरभरून आशिर्वाद दिला.
           गेल्या दहा वर्षात विद्यमान आमदारांनी कोणतेही जनतेचे प्रश्न मार्गी लावलेले नाही. साधा पिण्याचा पाण्याचा प्रश्न देखील ते मार्गी लावू शकलेले नाही, तर या विधानसभेतील नागरिकांच्या समस्या कसे सोडवतील, जर अंबरनाथ विधानसभेचा विकास हवा असेल, तर महाआघाडीचे उमेदवार रोहित साळवे यांना एकदा प्रचंड मतांनी विजयी करा, मंग कशा विकास आम्ही करू दाखवतो ते पहा. असे मार्गदर्शन जिल्हा उपाध्यक्ष ऍड. यशवंत जोशी व अंबरनाथ शहाराध्यक्ष प्रदीप पाटील यांनी केले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!