ठाणे विश्व

डोंबिवली ग्रामीण मधील नागरिकांचा रमेश म्हात्रे यांना विजयासाठी आशिर्वाद..!

डोंबिवली : १४४ कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील शिवसेना – भाजपा – रिपाई – रयतक्रांती – शिवसंग्राम महायुतीचे उमेदवार रमेश सुकऱ्या म्हात्रे यांनी रविवारी ग्रामीण मतदारसंघातील आयरे गाव, तुकाराम नगर, सुनील नगर, श्रीखंडेवाडी, नंदिवाली रोड, आजदेगाव या परिसरातून प्रचार झंझावाती प्रचार करत ग्रामीण मतदार संघ पिंजून काढला. तसेच शिवसेना – भाजपा – रीपाय महायुतीच्या भाजपा डोंबिवली मध्यवर्ती कार्यालयात जाऊन भेट देऊन तेथील पदाधिकारी व ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला.
                            प्रचारावेळी पाथर्ली विभागाचे मनसेचे माजी शाखाअध्यक्ष व ज्येष्ठ पदाधिकारी सुभाष सावंत यांनी रमेश म्हात्रे यांच्या प्रचारादरम्यान शिवसेनेमध्ये प्रवेश करून रमेश म्हात्रे यांचा प्रचार केला. तसेच मतदारांनी विकासपुरुष म्हणून रमेश म्हात्रे यांचे जोरदार स्वागत करून महिला वर्गाने व ज्येष्ठ नागरिकांनी देखील विजयासाठी आशीर्वाद देऊन सैदव आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहू अशी ग्वाही देखील नागरिकांनी महायुतीचे उमेदवार रमेश म्हात्रे यांना दिली. याप्रसंगी शहरप्रमुख राजेश मोरे, भाजपा जिल्हा सरचिटणीस नंदू परब, विधानसभा संघटक तात्यासाहेब माने, निवडणूक प्रतिनिधी शरद गंभीरराव, भाजपा नगरसेवक निलेश म्हात्रे महानगर संघटक वैशाली दरेकर, ग्रामीण विधानसभा संघटक कविता गावंड, शहर संघटक मंगला सुळे, किरण मोंडकर, उपशहरप्रमुख किशोर मानकामे, विवेक खामकर, जयंता पाटील भाजपा पदाधिकारी नंदू जोशी, उमेश पाटील व महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!