ठाणे

पालिकेच्या कारवाईत ५०० किलो प्लॅस्टीक जप्त; २५ हजार रुपये दंड वसूल

डोंबिवली :-  ( शंकर जाधव  )`स्वच्छता ही सेवा` या मोहिमे अंतर्गत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने कल्याण मधील मॉल व इतर ठिकाणी केलेल्या कारवाईत सुमारे  ५५०  किलो प्लास्टीक जप्त करून २५ हजार रुपये दंड वसूल रुपये  करण्यात आले. महापालिकेने स्थापन केलेल्या या पथकातील आरोग्य निरिक्षकांमार्फत दररोज महापालिकेच्या प्रभागात पाहणी करुन प्लास्टीक कचरा संकलनाची करण्यात आली. नागरिकांनी आपल्याकडील प्लास्टीक कचरा कल्याण मध्ये बारावे येथील प्रकल्पाचे‍ ठिकाणी तसेच महापालिकेच्या हजेरीशेड मध्ये त्याचप्रमाणे लोकग्राम येथील प्लॅस्टीक वेस्ट बँकमध्ये आणि डोंबिवली विभागीय कार्यालयातील घनकचरा विभागात तसेच प्रगती कॉलेज समोर दत्तनगर येथे प प्लॅस्टीक वेस्ट बँकेत जमा करावा असे आवाहन महापलिकेतर्फे करण्यात आले.

     कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयात आयुक्त गोविंद बोडके यांचे प्रमुख उपस्थितीत आणि डोंबिवली विभागीय कार्यालयात विभागीय उपायुक्त मारुती खोडके यांचे प्रमुख उपस्थितीत `एकल प्लास्टीक निर्मूलनाबाबत` व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक घेण्यात आली.बैठकांमध्ये व्यापाऱ्यांनी प्लास्टीक पिशव्या वापरणे बंद करुन कापडी पिशव्या वापराव्यात व नागरिकांनाही कापडी पिशव्याचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले.डोंबिवलीतील  अनेक नागरिकांनी घरात जमा झालेला प्लॅस्टीक कचरा महापालिका कार्यालयाजवळील नजीकच्या के.वि.वीरा.शाळेत जमा केला. कचरा संकलनाच्या जनजागृतीसाठी उर्जा फांउडेशन या एन.जी..ने तसेच विवेकानंद सेवा मंडळ या संस्थेने हातभार लावला. महाराष्‍ट्र प्लास्टीक व थर्माकॉल अविघटनशील वस्तूंचे  ( उत्पादनवापरविक्रीहाताळणी व साठवण ) या                      शासनाच्‍या अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या  अनुषंगाने सहाय्यक आयुक्त गणेश बोराडे यांच्या अधिपत्याखाली स्वतंत्र पथक निर्माण करण्यात आले आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!