कल्याण : प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, या उक्तीनुसार कल्याण ग्रामीण मतदारसंघातील शिवसेना — भाजप महायुतीचे उमेदवार रमेश म्हात्रे यांच्या पत्नी गुलाब म्हात्रे या प्रचारात उतरल्या आहेत. पतीच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी पतीचा प्रचार सुरु केला आहे.
गुलाब म्हात्रे या कल्याण — डोंबिवली महापालिकेत शिवसेनेच्या नगरसेविका आहेत. रमेश म्हात्रे हे देखील शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक आहेत. दोघे पती — पत्नी महापालिकेत सोबत आहेत. विधानसभा निवडणुकीत हीच सोबत कायम राखत गुलाब म्हात्रे यांनी पती रमेश म्हात्रे यांच्या प्रचारात भाग घेतला. माझ्या प्रत्येक समाजकार्यात पत्नीची साथ असते असे रमेश म्हात्रे यांनी सांगितले.
या प्रचारात भाजप नगरसेविका सुनिता पाटील यांचीही म्हात्रे यांना साथ लाभली आहे. महायुतीचे उमेदवार म्हणून भाजप नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या प्रचारात उतरले आहेत. ऑक्टोबरचे ऊन जास्त आहे. मात्र त्या उन्हाची पर्वा न करता सागर्ली, स्टार कॉलनी, गणेशनगरात म्हात्रे यांच्या प्रचारात पत्नी गुलाब यांनी पुढाकार घेतला. तसेच म्हात्रे यांनी नागरिकांशी संवाद साधून ज्या काही समस्या असतील त्या सोडवण्याची ग्वाही दिली. म्हात्रे यांच्या प्रचारादरम्यान महिला व ज्येष्ठ नागरिकांनी म्हात्रे यांच्याशी संवाद साधला.
कल्याण ग्रामीणचे महायुतीचे उमेदवार रमेश म्हात्रे यांच्या अर्धांगिनी उतरल्या प्रचारात
