ठाणे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे  खोटारडे  – राज ठाकरे

डोंबिवली ( शंकर जाधव ) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अतिशय चांगला माणुस आहे. मात्र सध्या खूप खोटे बोलतात .सव्वा लाख विहीर बांधल्याचे सांगितले मात्र त्यांनी विहिरी बांधल्या नसून विहिरीसारखे खड्डे बांधले आहेत.डोंबिवली विधानसभा मतदार संघाचे मनसेचे उमेदवार मंदार हळबे आणि कल्याण ग्रामीण मतदार संघाचे उमेदवार प्रमोद (राजु ) पाटील यांची प्रचारसभा मंगळवारी सायंकाळी डीएनसी शाळेच्या मैदानात पार पडली यावेळी ते बोलत होते.
    स्मार्ट लोकांची बकाल सिटी अशी डोंबिवली शहराची नवी ओळख निर्माण होत आहे. स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षानंतरही मुलभूत सुविधांचा मुद्दा हातात घेऊन निवडणुका लढत आहोत हीच लाजेची बाब आहे.  गेली दहा वर्ष सत्तेवर असणारे राज्यमंत्री या शहरात काय काम करतात असा थेट सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरही त्यांनी यावेळी टीका केली.
    डोंबिवली शहरात पुन्हा युतीचेच आमदार निवडून दिले तर पुढील दहा वर्षात डोंबिवली शहर सोडून जाणे हाच पर्याय नागरिकांच्या हातात असेल. फडणवीसांनी सहा साडेसहा कोटी कल्याण- डोंबिवलीच्या विकासाला देणार होते. मात्र हे पैसे त्यांनी दिले नाहीतच या व्यतिरीक्त महापालिकेतर्फे कोणत्या गोष्टी आपण शहराला देऊ शकतो याचा लेखाजोखाही त्यांनी ठेवला नाही. या शहरात होणाºया कामाचे कधीच कोणी ऑडीट केले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अतिशय चांगला माणुस आहे. मात्र सध्या खोटे बोलण्यास शिकला असल्याची मार्मिक टिकाही त्यांनी मुख्यमंत्र्यांवर केली. पृथ्वीराज चव्हाण कारभार माजोरडा होता. त्याच्याकडे सत्ता आली मात्र या सत्तेचा महाराष्ट्राला उपयोग झाला नसल्याचेही त्यांनी सांगितले. खड्ड्यांबद्दल बोलताना भाजप सरकारने सव्वा लाख विहीर बांधल्याचे सांगितले मात्र त्यांनी विहरी बांधल्या नसून विहरीसारखे खड्डे बांधले आहेत. या खडड्यामुळे कित्येक लोकांचे रोज जीव जातात. बंगालच उदाहरण देत बंगालच्या मंत्रालयात उद्वाहिनीमध्येही बंगाली भाषेत गाणी लावली जातात आपल्या महाराष्ट्रात अशा कोणत्याही प्रकारे आपली भाषा बोलली जात नाही. गडकिल्ले भाड्याने देण्याऐवजी त्याचे उत्तम प्रकारे संवर्धन करण्याची गरज असल्याचेही त्यांनी त्यांच्या भाषणात स्पष्ट केले. उत्तर भारतीयांमुले शहराला बकालपणा अधिक येत असून उत्तरभारतातून सार्वधिक लोंढे ठाणे जिल्ह्यातील विविध शहरात येत असल्याचे त्यांनी नमुद केले.
   १९२५ साली स्थापन झालेली राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सत्तेशिवाय व्यापक प्रमाणात काम करते. आता मात्र नको त्या उमेदवाराला निवडून दिले जात असल्याची त्यांनी खंत व्यक्त केली. इतके असुविधांचे शहर असतानाही पुन्हा तेच आमदार कसे निवडून देतात आणि शहरे बकाल होणार असतील तर आमदार काय करतात असे तुम्हाला विचारावेसे वाटत नाही का असा प्रतिप्रश्न त्यांनी उपस्थितांना केला. पुन्हा तेच तेच आमदार निवडून द्याायचे असतील तर निवडणुका घ्यायचाच कशाला अशी खंत त्यांनी व्यक्त केली.  जे राज्यकर्ते निवडून देता त्यांना नागरिक थंड असल्याची पूर्णत: जाणीव आहे. त्यामुळे यावेळी तरी विरोधी पक्षात बसून काम करण्याची संधी द्याावी असे आवाहन करत राजु पाटील आणि मंदार हळबे निवडून आल्यास प्रत्यक्ष माझेच लक्ष राहील असे आश्वासन मतदारांना दिले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!