ठाणे

रमेश म्हात्रे यांच्या प्रचाररँलीला दिव्यात उत्सफुर्त प्रतिसाद

दिवा : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रंगत दिवसेंदिवस वाढत असून अंतिम टप्प्यातील प्रचार रंगात आला आहे . कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रमेश सुकऱ्या म्हात्रे यांच्या मंगळवारी काढलेल्या प्रचार रॅलीला दिवेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला . या प्रचार रॅलीत खासदार श्रीकांत शिंदे सहभागी झाले होते .प्रचार रॅलीला वाढता प्रतिसाद पाहून ही विजयाची रॅली असल्याचे मत खासदार श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केले .

या प्रचार रॅलीत दिव्यातील उपशहर प्रमुख शैलेश पाटील , गणेश मुंडे ,नगरसेवक अमर पाटील , दीपक जाधव ,नगरसेविका सुनीता मुंडे , दर्शना म्हात्रे , यांसह शिवसेना पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित  होते.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!