डोंबिवली ( शंकर जाधव ) डोंबिवली पूर्व – पश्चिमेला जोडणारा कोपर पूल काही दिवसांपूर्वी दुरुस्तीच्या कामासाठी बंद करण्यात आल्या. हा पूल दुरुस्त होण्यास कमीत कमी सहा महिने लागणार आहेत. मात्र स्थायी समितीचे सभापती दिपेश म्हात्रे तीन महिन्यात काम पूर्ण होतील असे सांगितले होते.मात्र अद्याप पुलाच्या दुरुस्तीला सुरुवात झाली नाही. त्यामुळे पालिकेच्या वेळकाढू भूमिकेचा फायदा पुलाचा दुचाकीस्वारांना होत आहे.पुलावर मोफत वाहनतळ झाले आहे.एकीकडे हा पूल बंद झाल्याने वाहनचालकांना वळसा घेत ठाकुर्ली येथील उड्डाणपुलावरून जावे लागत आहे. तर दुसरीकडे दुचाकीस्वारांचा पार्किंग प्रश्न काही दिवसांनकरिता का होईना सुटल्याचे दिसून आले.
डोंबिवलीत वाहनांची संख्या वाढत असल्याने वाहनांच्या पार्किंगचा प्रश्न वाहनचालकांना सतावत असतो. डोंबिवली पूर्व -पश्चिमेला वाहनतळ असूनही त्यासाठी पैसे मोजावे लागतात.कोपर पुल दुरुस्तीसाठी बंद केल्याने आता या पुलावर वाहनचालकांची नजर गेली.पुलावर आपले वाहन पार्क केल्यास पार्किंगचे पैसे लागणार नाही आणि वाहन चोरीची भीती नसते.म्हणून या पुलावर आपले वाहन सेफ असल्याचे समाधान असल्याने या पुलावर वाहन पार्किंग करण्यास सुरुवात केली आहे. पुलावर २०० पेक्षा जास्त दुचाकी पार्किंग होत आहेत.वाहतूक पोलिसांच्या काही अंशी डोकेदुकी कमी झाली आहे.