डोंबिवली : भीमशक्तीने एकत्रित येऊन कल्याण ग्रामीणमधील महायुतीचे रमेश म्हात्रे यांच्या पाठीशी उभे राहून विजयी करावे असे आवाहन केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी केले. रमेश म्हात्रे यांच्या प्रचारासाठी कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आठवले यांनी हे आवाहन केले.
तसेच डोंबिवलीतील होरॉयजन हॉलमध्ये झालेल्या महायुतीच्या मेळाव्यामध्ये खांदेश मराठा पाटील विकास प्रतिष्ठान, श्री पार्श्वचंद्र कच्छी जैन संघ, श्री आशापुरा चॅरिटेबल ट्रस्ट, अमान समाज पार्टी, कच्छी गुजराती एकता मंच, श्री राजस्थान जैन संघ अशा विविध समाजांनी महायुतीचे उमेदवार रमेश म्हात्रे यांना पाठींबा जाहीर केला. यावेळी गुजरातचे माजी राज्यसभा खासदार शंकरभाई वेगाड खा. डॉ. श्रीकांत शिंदे, शहरप्रमुख राजेश मोरे यांच्यासह गुजराथी बांधव व महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.