ठाणे

विद्यार्थांनी पालकांना मतदान करण्यास प्रवृत्त करा – अप्पर जिल्हाधिकारी वैदही रानडे

विद्यार्थांनी घेतली मतदान शपथ 

ठाणे दि  17 ऑक्टोबर 2019 : आई..बाबा..काका..मावशी..आत्या..यांना 21 ऑक्टोबरला नक्की मतदानाला पाठवू असे आश्वासन लिटील फ्लॉवर शाळेतील विद्यार्थांनी जिल्हा प्रशासनाला दिले. निम्मित होते, मतदान शपथीचे.

मतदान जनजागृती अभियानातर्गत या शाळेतील विद्यार्थांनी आज मतदान शपथ घेतली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती वैदही रानडे, निवासी उप जिल्हाधिकारी डॉ. शिवाजी पाटील, जिल्हा स्वीप नोडल अधिकारी रेवती गायकर उपस्थित होते.

यावेळी श्रीमती.रानडे यांनी उपस्थित विद्यार्थांशी संवाद साधला, त्या विद्यार्थांना म्हणाल्या लोकशाहीला  बळकट करण्यासाठी मतदान करणे अनिवार्य आहे. मतदानाच्या दिवशी घरातील 18 वर्षावरील सगळयांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करा. तुम्ही देशाचे उज्ज्वल भविष्य आहात. तुमचेही 18 वर्ष पूर्ण झाल्यावर मतदान करायला विसरू नका. असे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात 18 विधानसभा क्षेत्रात 21 ऑक्टोबरला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्या अनुषंगाने गेल्या अनेक दिवसांपासून स्वीप कार्यक्रमातर्गत  जिल्ह्यात विविध ठिकाणी उपक्रम सुरू आहेत. मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हा प्रशासनाचे सर्व स्तरातील घटकांना मतदानाचे महत्व पटवून देण्याचे काम सुरु आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!