ठाणे दि.18 ऑक्टोबर 2019 – विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 करीता ठाणे जिल्हयातील 18 विधानसभा क्षेत्रात सोमवार दि. 21 /10 /2019 रोजी सकाळी 7.00 ते सायंकाळी 6.00 वाजे पर्यंत मतदान घेण्यात येणार आहे. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर मतदार, उमेदवार, निवडणूक प्रतिनिधी, मतदान प्रतिनिधी (Polling Agents) यांना मोबाईल फोन, कॅमेरा, ईलेक्ट्रॉनिक वस्तू / गॅझेट यांच्या वापर करण्यास भारत निवडणूक आयोगाने सक्त मनाई केली असल्यामुळे मतदान केंद्रावर मतदारांनी मोबाईल वापरु नये,असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. राजेश नार्वेकर यांनी केले आहे.
मतदान केंद्रात मोबाईल वापरास मनाई
October 18, 2019
29 Views
1 Min Read

-
Share This!